औषधाचा जादा डोस घेतल्याने युवतीचा मृत्यू

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

पेडणे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी हे पुढील तपास करीत आहेत.
 

पेडणे: उगवे येथील वैभवी बाबाजी महाले (वय २२) या युवतीने औषधाचा जादा डोस घेतल्याने मृत्यू झाला. मंगळवारी (ता. २८) ही घटना घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार वैभवी महाले ही युवती एका डॉक्टरच्या दवाखान्यात नर्स म्हणून नोकरीला होती. सकाळी तिने दाढ दुखत असल्याने गोळ्या घेतल्या. त्यानंतर काही वेळाने ती भोवळ येऊन बेशुद्ध पडल्या. उपचारासाठी तिला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल केले असता काल दुपारी तिला मृत्यू आला. आज रोजी उत्तरीय तपासणीनंतर तिचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.

संबंधित बातम्या