जुने गोवे येथील एक युवक बुडाला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

आगोंद: काणकोण तालुक्यातील गालजीबाग या समुद्र किनाऱ्यावर उत्तर गोव्यातील पाच जणांचा गट (बुधवारी) सहलीसाठी आला होता. या गटातील खोर्ली, जुने गोवे येथील एक युवक संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास, समुद्र स्नान घेत असता बुडाला. काणकोण पोलिसांनी अनैसर्गीक मृत्यू म्हणून नोंद करून घेतली असून, मृतदेह रीतसर ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करता सांभाळून ठेवला असल्याची माहिती काणकोण पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्तानुसार, खोर्ली, जुने गोवे येथील एक युवक जेसन सेन्ट गोमीस (वय २९) हा युवक आज रोजी आपल्या अन्य चार मित्रांसह काणकोण तालुक्यातील गालजीबाग या समुद्र किनाऱ्यावर सहलीकरीता आला होता. यावेळी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास जेसन गोमीस हा बुडाला. घटनेची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

 

संबंधित बातम्या