सातवा युवा जागृती महोत्सव

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

अभिव्यक्तीतर्फे युवा जागृती महोत्सव
विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोष्टर बनविणे स्पर्धेतील विजेते

पणजी : ‘अभिव्यक्ती’ पणजीच्या संकल्पनेतून साकारलेल्या व युवकांनी युवकांसाठी घडवून आणलेला सातवा युवा जागृती महोत्सव इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) च्या सहयोगाने आयएमबी सभागृह व आझाद मैदान, पणजी या ठिकाणी उत्साहात पार पडला.

जैवविविधता मंडळ गोवा यांनी हा महोत्सव पुरस्कृत केला होता. त्याचे आयोजन अभिव्यक्तीतर्फे करण्यात आले होते. यामध्ये १२ ते २५ वयोगटातील युवक व युवतींसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात मोठ्या संख्येने युवक मंडळी सहभागी झाली होती. त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत आंद्रिया सिक्वेरा हिने प्रथम, यारीश यादव याने द्वितीय तर राधिका कोणी हिने तृतीय पारितोषिक पटकावले. विध्वेश पडियार व विनिधी लाड यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. मोहन गिरप व डॉ. राखी वांडेपारकर यांनी काम पाहिले.

पथनाट्य स्पर्धेत गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम, निर्मला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटने तृतीय पारितोषिक पटकावले. चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिक विद्यालय व सीईएस कला व वाणिज्य महाविद्यालय यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. ऐश्‍वर्या व वैभव कवळेकर यांनी परीक्षण केले. पोस्टर बनविण्याच्या स्पर्धेत सर्वोदय एज्युकेशन सोसायटी विद्यालय प्रथम, केंद्रीय विद्यालय द्वितीय, तर रोझरी हायस्कूल तृतीय यांनी पारितोषिके पटकावली. सेंट रिटाज हायस्कूल व मुष्टीफंड हायस्कूल यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली. अनघा देशपांडे व क्रांती च्यारी यांनी परीक्षण केले.

बिगर चित्रपट पर्यावरण गीत गायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक सर्वोदय एज्युकेशन सोसायटी विद्यालयाने पटकावले. द्वितीय पारिेतोषिक ब्लुम्स इंटरनॅशनल हायस्कूलला तर तृतीय पारितोषिक इम्यॅक्युलेट हार्ट ऑफ मेरी हायस्कूलला प्राप्त झाले. उत्तेजनार्थ पारितोषिके एल. डी. सामंत मेमोरियल हायस्कूल व सेंट अलॉयसीस हायस्कूल यांना देण्यात आल. परीक्षक म्हणून मुके घाटवळ व स्नेहल गुरव यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील उत्कृष्ट गीत रचनेसाठी एल. डी. सामंत हायस्कूलला प्रथम, इम्युक्युलेट हार्ट ऑफ मेरी हायस्कूलला द्वितीय तर युनियन हायस्कूलला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. उत्तेजनार्थ पारितोषिके ब्लुम्झ इंटरनॅशनल हायस्कूल व डिव्हाईन मर्सी इंग्लिश हायस्कूल यांना देण्यात आली.

उत्कृष्ट मधुर गीतासाठी प्रथम ब्लुम्स इंटरनॅशनल हायस्कूलला, तर अनुक्रम उत्तेजनार्थ तीन पारितोषिके इम्यक्युलेट हार्ट ऑफ मेरी हायस्कूल, एल. डी. सामंत हायस्कूल व सर्वोदय एज्युकेशन सोसायटी हायस्कूल यांना प्राप्त झाली. सर्व विजेत्यांना जैवविविधता मंडळ गोवा (गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड) पुरस्कृत रोख बक्षिसे देण्यात आली.

वास्कोतील शिमगोत्सव मिरवणूकीला परवानगी

अभिव्यक्तीच्या सचिव गीता मंगेशकर, आय. एम. बी. च्या कार्यकारी सदस्या उज्वला कामत तारकर व बायोडायव्हर्सिटी बोर्डचे सदस्या सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. विजेत्यांना प्रमुख पाहुणे संतोष कुमार, डॉ. प्रदीप सरमोकादम व अभिव्यक्तीचे अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या हस्त पारितोषिके प्रदान करण्यात आली. सुधा कला प्रांगण व अभिव्यक्तीच्या कलाकारांनी समारोप सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्याविष्कार घडविला.

संबंधित बातम्या