उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकही उमेदवार इच्छुक नाही.

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

सासष्टीमधून पहिल्या दिवशी
एकही अमेदवारी अर्ज नाही.

सासष्टी : राज्यातील उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रक्रियेस (गुरुवारी) सुरवात झाली आहे. पण, पहिल्या दिवशी सासष्टी तालुक्यामधून एकही इच्छुक उमेदवारानी अर्ज भरलेला नाही.

सासष्टी तालुक्यात राय, नुवे, कोलवा, बाणावली, वेळ्ळी, दवर्ली, गिरदोली, कुडतरी, नावेली या नऊ मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. 

राय, नुवे, कोलवा, बाणावली, वेळ्ळी आदी मतदारसंघातील निर्वाचन अधिकारी म्हणून विशाल कुंडईकर यांची नेमणूक करण्यात आली तर दवर्ली, गिरदोली, कुडतरी, नावेली आदी मतदारसंघातील निर्वाचन अधिकारी म्हणून शंकर गावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यात ५० पैकी ३१ मतदारसंघ आरक्षित ठेवण्यात आलेले असून, यात सासष्टीतील नऊ पैकी सहा मतदारसंघाचा समावेश आहे. नुवे (एसटी महिला), कोलवा (ओबीसी महिला), वेळ्ळी (ओबीसी), बाणावली (ओबीसी), गिरदोली (महिला), कुडतरी (महिला) हे राखीव मतदारसंघ आहेत.
 

हेही वाचा : विज्ञान हे एक सुसंघटित ज्ञान आहे.

संबंधित बातम्या