जिल्‍हा पंचायत निवडणुकीचे पडघम

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

सांताक्रूझमध्ये सुनील सांतिनेजकर इच्छुक

सध्या सांताक्रूझमधील शांतादुर्गा क्रीडा व सांस्कृतिक क्लबचे अध्यक्ष, कालापूर उत्कर्ष मंडळ, कलाअंकूर पणजीचे अध्यक्ष आणि राईझिंग गोवन्सचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य बहुश्रुत आहे.

सांताक्रूझ : सांताक्रूझ जिल्हा पंचायत मतदारसंघामध्ये सुनील सांतिनेजकर हे इच्छुक आहेत. ते शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून लोकांना परिचित आहेत. सांताक्रूझ क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत आहेत.

सामाजिक स्तरावरील कार्याची आवड आणि लोकांबरोबर राहून विकास साधण्याची कला असलेले सुनील सांतिनेजकर यांना यंदाच्या निवडणुकीत मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची इच्छा असल्याने त्यांनी मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेठी घेण्यास सुरवात केली आहे. मतदारांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांना यशस्वी होण्याची शक्यता त्यांनी यावेळी बोलून दाखवली. विकास हा लोकांबरोबर राहून, त्यांच्या अडचणी समजावून घेऊन तसेच स्वतःकडे असलेल्या विविध संकल्पना राबवून करता येतो, यावर त्यांचा दृढविश्‍वास आहे.

सामाजिक, सांस्कृतिक हित हे आपणच जपले पाहिजे, हे त्यांनी आजवरच्या सामाजिक कार्यातून दाखवून दिले आहे. विविध मंडळांवर अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द ही नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे. सांताक्रूझ कालापूर भागातील विविध स्तरातील लोकांशी त्यांची असलेली जवळीक त्यांना यशोशिखरावर नेईल, असे अनेक मतदारांनी विश्‍वासाने बोलून दाखवले.

 

डॉक्‍टर हा वाट चुकलेला समाजसुधारक

संबंधित बातम्या