झुआरी पुलाच्या समांतर रस्त्याची आमदार साल्ढाणा यांच्याकडून पाहणी

Dainik Gomantak
गुरुवार, 23 एप्रिल 2020

झुआरी पुलाच्या समांतर रस्त्याची  आमदार साल्ढाणा यांच्याकडून पाहणी 

कठठाळी,

कुठ्ठाळी येथील वळांत झुआरी पुलाच्या समांतर रस्त्याच्या कामाची पाहणी आज (बुधवारी) कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती एलीना सालढाणा यांनी केली. सोमवारी पडलेल्या पावसामुळे वळांत येथील ग्रामस्थांना या अर्धवट कामाचा पाणी घरामध्ये घुसल्याने सर्वांची तारांबळ उडाली.
या घटनेची दखल घेऊन कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती साल्ढाणा यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता महंतेश हिरेमठ, झुआरी पुलाचे बांधकाम करणारी दिलीप बिल्डकाँम कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक आरोग्य स्वामी, प्रकल्प कन्सलटंट रघुदत्त पाणंदीकर तथा ग्रामस्थ याच्यासह पाहणी करण्यात आली.
वळांत येथील रस्त्याच्या संरक्षक भींतीचे काम अपूर्ण राहिल्यामुळे पाऊस पडताच पावसाचे पाणी थेट लोकांच्या घरात घुसून फटका बसल्याचे उघड झाले. टाळेबंदीमुळे हे बांधकाम गेला महिना भर बंदच होते. हे अपूर्ण संरक्षक भिंतीचे बांधकाम कंपनीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
कुठ्ठाळी पाजेंतार या ठिकाणी महामार्गाच्या बाजूला सखल भागात मातीचा भराव टाकल्याने महामार्गाच्या आरपार असलेले गटार तुंबले असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे पावसाळ्यात पूरसदृष परिस्थिती निर्माण होऊ शकते. या तक्रारीची दखल घेऊन मुरगावचे मामलेदारांना याबाबत तातडीने उपाय योजना करण्यासाठी आमदार साल्ढाणा यांनी कळविले आहे.

 

goa goa goa 

 

संबंधित बातम्या