गोव्यातील त्या पाच पालिकांचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाकडून राखीव

Supreme Court is reserved ward reservation of five municipal elections in Goa
Supreme Court is reserved ward reservation of five municipal elections in Goa

पणजी: मडगाव, मुरगाव, सांगे, केपे व म्हापसा या पाच पालिकांच्या प्रभाग आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आज पूर्ण होऊन त्यावरील निवाडा सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. या पाच पालकांमधील निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्याने ही निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे.
आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यावर सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उच्च न्यायालयाला निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद केला होता. राज्य निवडणूक आयोगातर्फे ज्येष्ठ वकील पी एस नरसिंह यांनी बाजू मांडताना उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात कोणतेही कारण नसताना उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या निवडणूक प्रभाग आरक्षणाशी आयोगाचा काहीही संबंध नसून राज्य सरकारने केलेल्या आरक्षणानुसार हे निवडणूक प्रक्रिया आयोगाने सुरू केली होती अशी बाजू मांडली.

पालिका आरक्षण याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दारान तर्फे सरकारच्या भूमिकेवर ज्येष्ठ वकील आत्माराम नाडकर्णी यांनी घणाघाती युक्तिवाद करीत उच्च न्यायालयाने दिलेला निवाडा योग्य असून सरकारने त्याला आव्हान दिलेली याचिका फेटाळण्यात यावी अशी बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी शर्मद रायतूरकर व अमोल काणेकर यांनी सादर केलेल्या हस्तक्षेप अर्जावर ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडताना  सांगितले की जर उच्च न्यायालयाचा निवाडा ठरवल्यास या पालिकांची निवडणूक आणखी सहा महिने पुढे जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com