Jofra Archer ची घातक गोलंदाजी, मोडला 30 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

Pranali Kodre

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास दोन वर्षांनी पुनरागमन केले आहे.

Jofra Archer | Dainik Gomantak

आर्चरने पुनरागमनाच्या या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मोठा विक्रम केला आहे.

Jofra Archer | Dainik Gomantak

त्याने किम्बर्ली येथे 1 फेब्रुवारी 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात 9.1 षटके गोलंदाजी करताना 40 धावा देत 6 विकेट्स घेतल्या.

Jofra Archer | Dainik Gomantak

त्यामुळे आर्चर दक्षिण आफ्रिकेमध्ये वनडेत सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा परदेशी गोलंदाज ठरला आहे.

Jofra Archer | Dainik Gomantak

हा विक्रम करताना त्याने वसिम अक्रमच्या 30 वर्षे जुन्या विक्रमाला मागे टाकले आहे.

Jofra Archer | Dainik Gomantak

वसिम अक्रम यांनी 15 फेब्रुवारी 1993 रोजी इस्ट लंडनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडेत 16 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

Wasim Akram | Dainik Gomantak

दक्षिण आफ्रिकेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या परदेशी गोलंदाजांमध्ये आर्चर आणि अक्रम यांच्यानंतर युजवेंद्र चहल तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Yuzvendra Chahal | Dainik Gomantak

चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्यूरियनला 4 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या सामन्यात 22 धावांत 4 विकेट्स घेतल्या होत्या.

Yuzvendra Chahal | Dainik Gomantak

दरम्यान आर्चरने केलेल्या कामगिरीमुळे इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा वनडे सामना 59 धावांनी सहज जिंकला.

Jofra Archer | Dainik Gomantak
Shubman Gill and Rohit Sharma | Dainik Gomantak