भारतीय रेल्वेने देशातील पहिली मिल्क एक्सप्रेस सुरू केली

First milk train leaves from Nagpur to Delhi Hazrat Nizamuddin station
First milk train leaves from Nagpur to Delhi Hazrat Nizamuddin station

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या वेळी भारतीय रेल्वेने (Indian Railway) दूध एक्सप्रेस(Milk Express) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताची पहिली दूध  नागपूरहून(Nagpur) दिल्लीकडे रवाना झाली आहे. ही ट्रेन 40 हजार लिटर दुधासह दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकात(Delhi Hazrat Nizamuddin station) पोचत आहे. लॉकडाऊन दरम्यान दिल्लीतील दुधाची मागणी पूर्ण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मदर दूध डेअरी(Mother milk dairy)  हा पुरवठा करीत आहे. ही ट्रेन गुरुवारी रात्री 12 वाजून 55 मिनिटांनी नागपूरहून निघाली ती आज सायंकाळी हजरत निजामुद्दीन स्थानकात पोहोचेल. गरज भासल्यास भविष्यात अशी आणखी एका गाडीची सोय आम्ही उपलब्ध करू असे मदर डेअरी च्या वतीने सांगण्यात येत आहे.(First milk train leaves from Nagpur to Delhi Hazrat Nizamuddin station)

दिल्लीला यावेळी कोरोनाचा फार त्रास झाला आहे. येथे ऑक्सिजनची मोठी समस्या निर्माण झाली आहे, यामुळे दिल्लीच्या केजरीवाल सरकारचाही ताण वाढला आहे. दिल्लीला दररोज 970 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे, परंतु तिथे आता सुमारे 550-600 मेट्रिक टन ऑक्सिजनच मिळत आहे.

सध्या दिल्लीत 10 मे पर्यंत लॉकडाउन लावण्यात आले आहे. अजूनही कोरोनाच्या नव्या प्रकरणात वाढ होत आहे. लोक स्वतः लॉकडाऊनची मागणी करत आहेत त्यांमुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. व्यापारी संघटनांनी ही मुदत 17 मेपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे, गरज पडल्यास लॉकडाउन वाढविणार, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com