नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा...

नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा...
If you are thinking of buying a new car then definitely read this news

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) महामारीमुळे सर्वांचीच अर्थव्यवस्था (Economy) कोसळली आहे. परंतु तरी देखील कार (Car) ही सर्वसामान्यांच्या घरातील एक हिस्सा बनली आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर काही दिवस वाट पाहा, कारण कार लव्हर्स अनेक दिवस ज्या गाड्यांच्या प्रतिक्षेत होते, ज्या गाड्या खूप आधी बाजारात (Market) येणे गरजेचे होते त्या गाड्या आता लवकरच बाजारात येणार आहेत. (If you are thinking of buying a new car then definitely read this news)

भारतात गाड्यांच्या मागणीत रोज वाढ होताना दिसत आहे. ऐकीकडे कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी नव्या गाड्यांचे लॉंचिंग (Launching) पुढे ढकलले असले, तरी ग्राहकांनी आपल्या आवडत्या गाड्यांची बुकींग करण्यास सुरुवात केली आहे. येणाऱ्या काळात या कार भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. 

Hyundai Alcazar : एसयूवी कारची वाढती मागणी पाहून कंपनीने न्यू हुंडाई अल्काजार ही लवकरच भारतीय बाजारात येणार आहे. ही 5 सिटर गाडी एसयूवी हुंडाई क्रेटाचे पुढील क्रिऐशन आहे. याचे डूअल-टोन इनटिरियर या गाडीचे वेगळेपण आहे. यात अॅप्पल कार प्ले आणि ऍनराॅइड ऑटो कनेक्टिविटी सोबत 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टेरिंग व्हिल कंट्रोल या सारखे खास फिचर्स आहेत. या कारच्या इंजिन 1.5 लिटर  क्षमतेचे असूल, पेट्रोल आणि डिझेलमध्ये ही उपलब्ध असेल. या शिवाय 1.4 लिटरचे टर्बो चार्ज पेट्रोल क्षमतेचे इंजिन देखील उपलब्ध आहे. हे इंजिन 6 स्पीड म्यनुअल आणि  7 स्पीड डुअल क्लच सोबत येते. खरे तर ही गाडी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात येणार होती. पण कोरोना महामारीमुळे ही गाडी जूनमध्ये लॉंचकरण्याच येईल. 

2021 Skoda Octavia: स्कोडा ऑटो इंडिया कंपनीने नवीन 2021 स्कोडा ओक्टेविया सेडान कार लवकरच बाजारात येत आहे. या जागतीक लॉंचिंग दोन वर्षे आधिच करण्यात आले होते. पण काही कारणांनी याला भारतात येण्यास थांबविण्यात आले होते. नवीन  ओक्टेविया 2021 मध्ये  2.0 लीटर TSI टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे जास्तीत जास्त 190 एचपीचा पॉवर  निर्माण करेल. या सह dual-clucth ऑटोमॅटिक 7 स्पीड गिअर बॉक्सही देण्यात आला आहे. ही गाडी मागील स्कोडा गाडीतुलनेत थोडी मोठी आहे.  स्कोडा इंडियाचे प्रमुख Zac Hollis यांनी नवीन ऑक्टव्हिया गाडी जूनमध्ये भारतात दाखल होईल असे सांगितले आहे. 

Volkswagen Taigun : जर्मनी की प्रमुख ऑटोमोबाईल (Automobile) कंपनी फॉक्सवेगन भारतात नवीन  Taigun कार लॉंच करण्याचा विचार करत आहेत. कंपनीची नवीन एसयूव्ही नवीन MQB सारखी डिझाईन केली गेली आहे. कंपनीने सांगितल्या नुसार यात १.० लिटर आणि १. 1.5 लिटर TSI  पेट्रोल इंजिन वापरण्याच येणार आहे. 1.0 लीटर पेट्रोल इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि स्वयंचलित गिअरबॉक्ससह येईल. मोठ्या इंजिनमध्ये 7 इंजिन स्वयंचलित गिअरबॉक्स देण्यात आले आहे. भारतात  याची स्पर्धा सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा आणि मध्यम आकाराच्या एसयूव्ही स्कोडा कुशक सारख्या मॉडेल्सशी होईल असे सांगण्याच आले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com