रिझर्व्ह बॅंकेचं पतधोरण जाहीर; व्याजदरात नो बदल

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 7 एप्रिल 2021

पतधोरण आढावा समितीने रोपो रेट 4 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

देशात कोरोनाचं वाढत संकट आणि वाढता महागाई दर या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेकडून पतधोरणामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही, असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता. हा अदांज खरा ठरला असून, तीन दिवसांच्या आढावा बैठकीनंतर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केलं आहे. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे व्याजदर कायम राहणार आहे. त्यामुळे कर्जदारांवरील ईएमआयचा भार वाढलेला नसला, तरी दिलासाही मिळालेला नाही.

पतधोरण आढावा समितीची बैठक सोमवारपासून सुरु होती. आज आढावा समितीची बैठक संपल्यानंतर आरबीयआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केलं आहे. ‘’कोरोना संक्रमण वाढत असलं तरी अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे अनिश्चितेतही भर पडली आहे. अशी सगळी परिस्थिती असताना भारत आव्हानांवर मात करण्यासाठी तयार आहे. फेब्रुवारीमध्ये महागाई दर 5 टक्क्यांवर होता,’’ असं आरबीयआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे. (RBI announces credit policy No change in interest rate)

SBIची ग्राहकांसाठी मोठी घोषणा; घरबसल्या करा बँकिंगची कामे

पतधोरण आढावा समितीने रोपो रेट 4 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेटही 3.35 टक्के निश्चित करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे अर्थव्यस्थेसमोर पुन्हा एकदा आव्हानं उभी राहण्याची चिन्हं दिसत आहेत. असं असलं तरी 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये जीडीपी 10.5 राहणार असल्याचा अदांज आरबीआयने व्यक्त केला आहे. मागील पतधोरणामध्येही आरबीआयकडून जीडीपी वाढीचा हाच अंदाज वर्तवला होता.

मागील पतधोरणामध्ये आढावा समितीने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अनुक्रमे 4  टक्के आणि 3.35 टक्के निर्धारीत केला होता. तसेच जिडीपीचा अंदाज 10.5 टक्केच व्यक्त करण्यात आला होता. कोरोनाचं संकट वाढत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी पतधोरण समितीने मागील पतधोरण पुढे चालु ठेवण्य़ाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जदारांना ईएमआयमध्ये कोणताही दिलासा मिळालेला नसला तरी झळही बसलेली नाही.
 

संबंधित बातम्या