Share Market Update : आठवड्याच्या पहिल्याच सत्रात भांडवली बाजार कोसळला 

Share Market
Share Market

देशातील भांडवली बाजाराने आज सर्वात मोठी घसरण नोंदवली आहे. आठवड्याच्या पहिल्याच सत्र व्यवहारात मुंबई भांडवली बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 3.44 टक्क्यांनी खाली आला आहे. त्यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील आज 3.53 टक्क्यांनी घसरला आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी घसरण नोंदवली होती. त्यानंतर आजच्या सत्र व्यवहारात देखील दोन्ही निर्देशकांनी जोरदार आपटी नोंदवली आहे. (The Sensex and the Nifty fell sharply today)

देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज तब्बल 1,707.94 अंक गमावत 47,883.38 च्या पातळीवर बंद झाला आहे. तर देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार म्हणून ओळखला जाणारा निफ्टी 524.05 अंकांनी खाली येत 14,310.80 वर स्थिरावला आहे. आजच्या सत्र व्यवहाराच्या सुरवातीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 634.67 अंकांनी घसरत 48,956.65 वर उघडल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 190.20 अंशांनी घसरत 14,644.65 वर खुला झाला होता. 

यापूर्वी मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात मुंबई भांडवली बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 154.89 अंशांनी खाली येत 49,591.32 वर बंद झाला होता. यासोबतच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 38.95 अंकांच्या किरकोळ घसरणीसह 14,834.85 च्या पातळीवर स्थिरावला होता. त्यानंतर आजच्या सत्रातील घसरण आणि मागील सत्रातील घसरण मिळून मुबई शेअर बाजाराचा (BSE) बीएसई 3.75 टक्क्यांनी व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई (NSE) 3.79 टक्क्यांनी खाली आलेला आहे. मागील काही दिवसांपासून भांडवली बाजारातील चढ-उतार आजच्या सत्र व्यवहारात प्रकर्षांने दिसून आले. 

दरम्यान, देशातील कोरोनाची (Corona) वाढती प्रकरणे आणि त्यामुळे पुन्हा एकदा टाळेबंदीचे (Lockdown) सावट यामुळे बाजाराने आजच्या व्यवहारात मोठी पडझड नोंदवल्याचे मत बाजारातील तज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे. आज मुंबई शेअर बाजारातील रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, एसबीआय, आयटीसी, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, एशियन पेंट, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, एनटीपीसी महाराष्ट्र बँक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, ओएनजीसी, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बरोडा, सन फार्मा, मारुती सुझुकी, सेंट्रल बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, टीसीएस, टायटन या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे पाहायला मिळाले. तर डॉक्टर रेड्डीज या कंपनीचे समभाग वधारले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com