विहिरीत कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचे अंश 

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

बोर्डा-कोंब भागात २० विहिरींत घातक जीवाणू

कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा अंश, लोकांत भीतीचे वातावरण

नगरसेवक आंद्राद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात विहिरींचे पाणी पिल्याने आजारी पडण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. त्यामुळे विहिरीच्या पाण्याचे नमुण्यांची चाचणी केली असता पाण्यात मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात कॉलिफार्म जीवाणू आढळून आले आहेत.

नावेली : कोंब आणि बोर्डा भागातील सुमारे २० विहिरींच्या पाण्यात कॉलिफार्म नामक कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचे अंश आढळून आल्याने या भागात भितीचे वातावरण पसरले आहे. या संबधी स्थानिक नगरसेवक ग्लेन आंद्राद यांनी आरोग्य खात्याला या संदर्भात कळविण्यात आले असून पुढील दोन दिवसात सर्व विहिरींची तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

या एकंदर प्रकारामुळे स्थानिकात भितीचे वातावरण आहे. बोर्डा भागात एका वाईन कारखान्याच्या दुषीत पाण्यामुळे विहिरींचे पाणी प्रदुषीत झाल्याची शक्‍यता लोकांनी व्यक्त केली आहे. ग्लेन आंद्राद यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २० विहिरींचे पाणी प्रदुषीत झालेले आहे. कॉलिफार्ममुळे कर्करोग होण्याची शक्‍यता असते. विहिरी फार जुन्या असून पिढ्यानपिढ्यांपासून येथील लोक या विहिरींचा वापर करीत आहेत. सुरवातीला होली स्पिरीट चर्चजवळ एका विहिरीच्या पाण्याचे नमुने घेऊन येथील खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता चाचणीच्या अहवालानुसार विहिरीच्या पाण्यात मोठ्या प्रमाण कॉलिफार्मचे जीवाणू आढळले. त्यामुळे सध्या विहिरींचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळने काढला आहे.

कर्करुग्णांचा आकडा वाढण्याची भीती
विहिरींच्या १०० मिलिलिटर पाण्यात ५४२ एमपीएन एवढे कॉलिफार्म आढळले आहेत. प्रत्यक्षात कॉलिफार्मची मात्रा २ एमपीएनपेक्षा अधिक असू नये. आरोग्य खात्याने यावर वेळीच उपाय न काढल्यास बोर्डा व कोंब भागात कर्क रोगाचा फैलाव होऊ शकतो. यापूर्वी देखील या भागात अनेक कर्क रुग्ण आढळून आले होते. आता आणखीन आकडा वाढेल अशी भीती ग्लेन आंद्राद यांनी व्यक्त केली आहे.

 

 

जिल्हा पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

संबंधित बातम्या