हसापूर पूल जीर्ण   

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

धारगळ:हसापूर पूल दुरुस्‍तीच्‍या प्रतीक्षेत
उपमुख्‍यमंत्र्यांकडून साडेतीन वर्षांपूर्वी आश्‍‍वासन, अद्यापही पूर्तता नाही; स्‍थानिकांकडून नाराजी

धारगळ:हसापूर पूल दुरुस्‍तीच्‍या प्रतीक्षेत
उपमुख्‍यमंत्र्यांकडून साडेतीन वर्षांपूर्वी आश्‍‍वासन, अद्यापही पूर्तता नाही; स्‍थानिकांकडून नाराजी
एप्रिल २०१७ रोजी उपमुख्यमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी हसापूर-पेडणे येथील १९६३ साली बांधण्‍यात आलेला जुनाट पूल नव्‍याने बांधण्‍यात येईल,असे आश्‍‍वासन दिले होते.आजपर्यंत नवीन पुलाबाबत काहीच कार्यवाही झाली नसल्‍याने जीर्ण व कमकुवत झालेल्‍या पुलावरून लोकांना, प्रवाशांना मार्गक्रमण करावे लागत आहे.अंदाजे साडे तीन कोटी रुपये खर्चून बांदा, पत्रादेवी, नेतर्डे, चांदेल मार्गे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्‍याच्‍या कामाच्या उद्‍घाटनप्रसंगी व्यासपीठावरून मंत्री मनोहर आजगावकर यांनी घोषणा केली.त्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सुदिन ढवळीकर यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. मंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले.गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर आणि देऊ मांद्रेकर यांच्‍या प्रयत्‍नातून हसापूर - इब्रामपूर, चांदेल गावाला जोडणाऱ्या पुलाचे उद्‍घाटन करण्यात आले होते.त्यानंतर गेल्‍या साडेतीन वर्षांत पुलाची साधी डागडुजीसुद्धा झाली नाही.गेल्या ५५ वर्षांत या पुलावरून अनेक वाहने जात आहेत. सध्या चांदेल, हणखणे, इब्रामपूर, तसेच दोडामार्ग तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात खडी आयात केली जात आहे. त्यामुळे या पुलावरून मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रॉली यांची रहदारी वाढली आहे.या पुलावरून सध्या चालत जात असताना भर वेगाने पुलावरून वाहन गेले, तर हा पूल कंपन झाल्‍यासारखे जाणवते.त्यामुळे चालत जाणेसुद्धा धोकादायक बनले आहे.२०१७ साली बांधण्यात आलेला बांदा ते चांदेल रस्‍त्‍याला अनेक ठिकाणी खडे पडले आहे. कंत्राटदाराने आपले पैसे सरकारकडून उचलले.मात्र, रस्त्याला खड्डे पडल्याने येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.मंत्री बाबू आजगावकर हे या भागातून चारवेळा निवडून आले आहेत. मात्र, हसापूरसारखा पूल जो महाराष्ट्राला व गोवा राज्याला जोडतो, त्याचबरोबर हसापूर, चांदेल, दोडामार्ग, कळणे, हळर्ण- तळर्ण या गावांना जोडतो. एवढा महत्त्‍वपूर्ण असणारा पूल दुर्लक्षित होत असल्‍याबद्दल स्‍थानिकांनी नाराजी व्‍यक्‍त केली.
या पुलावरून सकाळच्या वेळेला हसापूर, कळणे, या भागातून मुले शाळेला चालत जातात. संध्याकाळी बालभवनला मुले जातात. या भागाचा रस्ता रुंद आहे. मात्र त्‍या तुलनेत पूल अरुंद असल्‍यामुळे अपघाताला निमंत्रण ठरत आहे. पुलाच्‍या दोन्‍ही बाजूला वाहनांच्‍या चाकाचे ब्रेक लागल्‍याच्‍या खुणा उमटलेल्‍या दिसतात. पुढील दोन वर्षात मोपा आंतराष्ट्रीय विमानतळ होत आहे.त्याला लागणारा कच्चा माल काही प्रमाणात याच पुलावरून वाहतूक होणार आहे.अशावेळी या ठिकाणी नवीन पूल होणे अत्यंत गरजेचे आहे.या ठिकाणचा पूल लवकरात - लवकर व्हावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी सरकारकडे अनेकवेळा केली आहे.

पल्स पोलिओ लसीकरण प्रमाण ९७ टक्के

कुठलाही विकास करायचा असेल, तर त्या गावातील त्या मंत्र्यांचा त्या भागातील कार्यकर्ता सजग व कार्यक्षम असणे गरजेचे असते.मात्र कार्यकर्ते जर आश्‍‍वासनाबाबत विचारणा, पाठपुरावा करणार नसेल, तर आश्‍‍वासन देणाऱ्यांचे आयतेच फावते.कार्यकर्ते व लोकांनी आश्‍‍वासनाबाबत जाब विचारणे आवश्‍‍यक आहे.
 

संबंधित बातम्या