या बागायतीला लागली भीषण आग

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

तांबोसे येथे काजू बागायतीला आग लागून लाखो रुपायांची हानी

काजू बागायतीला लागलेली आग विझविताना अग्निशामकदलाचा बंब

पेडणे : तांबोसे येथे काल ता रोजी दुपारी काजू बागायतीला आग लागून सुमारे सोळा हजार चौरस मीटर जमिनीतील सुमारे २०० पेक्षा जास्त काजूंची झाडे जळून खाक झाली.

शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्यांना ते शक्य झाले नाही. पेडणे अग्निशामक दलास पाचारण केल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

आग लागून नुकसान झालेल्या शेतकऱ्यामध्ये केतन आत्माराम सामंत, मधुसुदन सामंत, महेश्वर सामंत, रवींद्र सामंत, पंकज सामंत, महाबळेश्वर सामंत, बापू गव्हाणकर, हरेष पाटील, अक्षय पाटील, रवींद्र सामंत या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. ऐन काजू हंगाम सुरू होत असताना, अशा प्रकारे आग लागून नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

टाटा स्टील लिमिटेडचा आर्थिक खर्च

संबंधित बातम्या