केरळमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार; दोनशे विद्यार्थ्यांना ओढलं जाळ्यात

दैनिक गोमन्तक
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच, केरळ राज्यात जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच, केरळ राज्यात जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. देशात मागील महिन्यापासून लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढाईचा अंतिम टप्पा चालू झाला आहे. मात्र त्यानंतर केरळ मधील मल्लपुरम जिल्ह्यातील दोन शाळेतील 192 विद्यार्थी कोरोना संक्रमित आढळले आहेत. दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसह 72 कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

मल्लपुरम जिल्ह्ह्यातील एका विद्यार्थ्याला संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि तपासणी करण्यात आल्यानंतर ही गोष्ट समोर आल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यानंतर याच परिसरातील इतर शाळांमधील विद्यार्थी व कर्मचार्‍यांचीही चाचणी घेण्यात आली. व यामध्ये अजून काही विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. 

''आंदोलन हे शेतकऱ्यांचे; येथे कोणत्याही राजकीय पक्षाचा टेन्ट उभा नाही...

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याचे निदर्शनास येत होते. आणि त्यातच आता 192 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सुरवातीच्या काळात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी म्हणून केरळ राज्याचे मॉडेल पुढे आले होते. याशिवाय देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यात केरळ मध्ये सापडला होता. त्यानंतर, मागील 24 तासांमध्ये केरळ राज्यात कोरोनाची 6,075 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर राज्यातील कोरोना विषाणूची एकूण संख्या 9,68,438 वर पोहोचली आहे.

दरम्यान, मलप्पुरममधील दोन शाळांमध्ये 638 मुलांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. ज्यामध्ये एका शाळेतील 149 विद्यार्थी आणि दुसऱ्या शाळेतील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. तर एका शाळेतील 39 कर्मचारी आणि दुसऱ्या शाळेतील 33 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आणि राज्यात मागच्याच महिन्यापासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते.         

संबंधित बातम्या