"गलवान संघर्षानंतर चीनी सैन्याला समजले की, आपल्याला जास्त प्रशिक्षणाची गरज"

bipin rawat.jpg
bipin rawat.jpg

भारतीय सैन्याच्या सैनिकांशी सामना झाल्यानंतर आपल्या सैन्यासाठी अधिक चांगले प्रशिक्षण देण्याची गरज असल्याची जाणीव चीनला झाली आहे. मागील वर्षी गलवान खोऱ्यात व इतर ठिकाणी झालेल्या चकमकीनंतर चीनला समजले की आता अधिक चांगल्या तयारीची गरज आहे असे चीनला समजले असल्याचे मत जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केले आहे.(After the Galvan conflict, the Chinese army realized they needed more training)

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, चिनी सैनिक अल्प कालावधीसाठी भरती केले जातात, याशिवाय त्यांना हिमालयासारख्या भागात लढा देण्याचा फारसा अनुभव नाही. एलएसीवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हालचालींबद्दल चर्चा करताना जनरल रावत म्हणाले की, मे आणि जून 2020 च्या महिन्यांत गलवान आणि इतर भागात झालेल्या हिंसक संघर्षानंतर चीनने सीमेवर आपली तैनातीमध्ये मोठे बदल केले आहेत. 

 प्रामुख्याने मैदानी भागांमधुन अल्प कालावधीसाठी चीनचे सैनिक भरती केले जातात, त्यामुळे त्यांना डोंगराळ भागात लढाई व तयारीचा अनुभव नाही. तर भारतीय सैनिक अशा भागात राहून आणि लढायला तज्ज्ञ मानले जातात तसेच सीमेवरील चीनच्या प्रत्येक हालचालींवर आम्ही नजर ठेवून आहोत असेही जनरल रावत यांनी यावेळी सांगितले.  

जनरल रावत म्हणाले की, तिबेटचा प्रदेश एक अवघड क्षेत्र मानले जाते. हा डोंगराळ भाग असुन या भागात लढाई करण्यासाठी आणि तग धरुन राहण्यासाठी तुम्हाला विशेष प्रशिक्षण हवे असते, अशा परिस्थीतीसाठी भारतीय सैन्य दलाचे जवान पूर्णपणे तयार आहेत. डोंगराळ भागातील लढाईसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी आमच्याकडे तसे प्रशिक्षण केंद्र असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com