काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या सोबत राहणार - अरविंद केजरीवाल

दैनिक गोमंतक
रविवार, 4 एप्रिल 2021

पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनी किसान महापंचायतीद्वारे आयोजित एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करताना आपण शेवटपर्यंत या आंदोलनाच्या सोबत राहणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करता आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार या शेतकऱ्यांसोबत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. त्यातच पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनी किसान महापंचायतीद्वारे आयोजित एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करताना आपण शेवटपर्यंत या आंदोलनाच्या सोबत राहणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. (Arvind Kejriwal said we will always stay with the farmers Arvind Kejriwal said)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे हरियाणाच्या जींद मध्ये किसान महापंचायतीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आपले समर्थन असल्याचे मत व्यक्त केले आहे. किसान महापंचायतमध्ये बोलताना "कोणतीही किंमत मोजावी लागली तरी आपण शेवट्पर्यंत शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबत राहणार आहोत, शेतकऱ्यांच्या मागण्यांसमोर केंद्र सरकारला झुकावेच लागेल. तसेच काळजी करू नका दिल्लीत तुमचा मुलगा मुख्यमंत्री आहे." असे मत व्यक्त केले आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, "मी शेतकऱ्यांच्या समर्थानात बलिदान द्यायला तयार आहे, त्यामुळे केंद्र सरकारने काहीही केले तरी आपल्याला त्याची पर्वा नाही." अरविंद केजरीवाल यांनी यावेळी दिल्लीत लागू करण्यात आलेल्या नॅशनल टेरिटरी ऍक्ट वरून सुद्धा केंद्र सरकारला धारेवर धरले. 

ईस्टर संडे निमित्त राहुल गांधींचे अनाथ मुलांसोबत जेवण; व्हिडीओ होतोय व्हायरल

भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी एनसीटी कायद्याबद्दल संसदेत बोलताना सांगितले होते की, किसान आंदोलनाला (Farmers Protest) दिलेल्या समर्थनाची शिक्षा म्हणून एनसीटी कायदा लागू केला आहे. मात्र आपण भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सांगू इच्छितो की आम्ही कोणत्याही शिक्षेला घाबरत नाही असे मत अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच किसान आंदोलनाला समर्थन करणे हे प्रत्येक देशभक्ताचे कर्तव्य आहे असेही यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सांगितले.  

दरम्यान, चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पासून शेतकरी दिल्लीच्या (Delhi) सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, पलवल बॉर्डर तसेच उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांत आंदोलन करत आहेत. हे तिन्ही कायदे थेट रद्द करावेत ही एकच मागणी घेऊन शेतकरी (Farmers) ठाम आहेत. तर केंद्र सरकार (Central Government) सुद्धा  सुधारणा करू मात्र रद्द करणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. 

संबंधित बातम्या