West Bengal : भाजपा उमेदवार अशोक दिंडाच्या गाडीवर हल्ला; टीएमसी समर्थकांवर आरोप

दैनिक गोमंतक
मंगळवार, 30 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये 1 एप्रिल रोजी दुसर्‍या टप्प्यातील 30 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे उमेदवार अशोक डिंडा यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी  क्रिकेटपटू अशोक डिंडा पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूरच्या मोयना मतदार संघातून भाजपचे उमेदवार आहेत. या हल्ल्यात त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. टीएमसीच्या समर्थकांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  मोयना बाजार जवळ टीएमसीच्या पन्नासहून अधिक समर्थकांनी अशोक डिंडा यांच्या गाडीला घेराव घालत दगडफेक केली. यात त्यांच्या गाडीच्या काच फुटल्याची माहिती समोर आली आहे. 

पॅन आधारशी लिंक केला का? नसेल तर, आधी ही बातमी वाचा 

बंगालच्या दुसर्‍या टप्प्यातील 30 जागांवर मतदान
पश्चिम बंगालमध्ये 1 एप्रिल रोजी दुसर्‍या टप्प्यातील 30 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. 19 महिलांसह 171 उमेदवारांचे भवितव्य या निंवडणुकीच्या माध्यमांतून ठरणार आहे.  बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राज्यातील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसने दुसर्‍या टप्प्यातील सर्व 30 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. तर कॉंग्रेस, डावे आणि त्यांचे घटक भारतीय सेक्युलर फ्रंट युनायटेड फ्रंटच्या बॅनरखाली लढत आहे. दुसर्‍या टप्प्यात सीपीएमच्या 15 पैकी 15 उमेदवार राजकीय रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत, तर कॉंग्रेसचे 9, सीपीआयचे 2 तर  एआयएफबीचे 1 आणि आरएसपीचे 1 असे उमेदवार आहेत. तर  44 उमेदवारांसह 32 अपक्षही रिंगणात आहेत.

दुसर्‍या टप्प्यात नंदीग्राममध्येही निवडणुका
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानात शनिवारी 79.79 टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राम विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर टीएमसीमधून भाजपमध्ये आलेले सूवेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून उभे आहेत.  त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या मतदार संघाकडे लागले आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांना 50 हजाराहून अधिक मतांच्या फरकाने पराभूत करू, असा दावा अधिकारी यांनी केला आहे. 
 

संबंधित बातम्या