केंद्र सरकारचा मोठा निर्णय: रेमडेसीव्हिर इंजेक्शनच्या किंमतीत घट

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसीव्हिरचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या शहरी भागामध्ये नव्हे तर ग्रामीण भागातही रेमडेसीव्हिर मिळावे यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. वाढते कोरोना प्रमाण आणि रेमडेसीव्हिरचा पुरवठा याचे प्रमाण व्यस्त बनत चालले आहे. राज्यात कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसीव्हिर औषधासाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची हाल होताना दिसत आहे. हे पाहून सरकारने रेमडेसीव्हिरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसीव्हिरचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. यामुळे कोरोना रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे. (Big decision of central government Reduction in the price of remedivir injection)

’केंद्र सरकारचा गैर भाजप शासित राज्यांवर अन्याय’’; सोनिया गांधीचा हल्लाबोल

डिसेंबर 2020 मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर रेमडेसीव्हिरचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आपलं उत्पादन घटवलं होतं. त्यात कोरोनाची पुन्हा एकदा लाट आल्यानंतर रेमडिसीव्हिरची मागणी वाढली. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हिर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच रेमडिसीव्हिरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून त्याच्या निर्यातीवर रोख लावण्यात आला. त्याचबरोबर या इंजेक्शनच्या साठेबाजीला आणि काळ्याबाजाराला आळा घालण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत.

 

संबंधित बातम्या