लखनऊमध्ये ऑक्सिजन रिफिलिंगदरम्यान झाला मोठा स्फोट; तिघांचा मुर्त्यू

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

कोरोना संक्रमाणाच्या वाढत्या आकड्यांसोबत देशभरात कोरोना रुग्णालयांमध्ये होणाऱ्या दुर्घटना देखील थांबताना दिसत नाहीये.

महामारीच्या या कठीण काळात कोरोना विषाणूच्या संक्रमानामुळे लाखो लोकांचे मृत्यू होता आहेत. तर दुसऱ्या बाजूला देशभरात कोरोना रुग्णालयात मोठ्या दुर्घटनांची मालिका सुरूच आहे. या दुर्घटनांमध्ये देखील आजवर शेकडो कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये अशीच एक दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. (Big explosion during oxygen refilling in Lucknow; Death of three)

कोरोना (Corona) संक्रमाणाच्या वाढत्या आकड्यांसोबत देशभरात कोरोना रुग्णालयांमध्ये होणाऱ्या दुर्घटना देखील थांबताना दिसत नाहीये. आज लखनऊ शहरातील चीनहटमध्ये ऑक्सिजन (Oxygen) भरत असताना मोठा स्फोट (Blast) झाला आहे. या घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एका रुग्णाचा देखील मृत्यू झाला असल्याचे समजते आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या घटनेत मृतांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे तसेच घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

राहुल गांधींचे केंद्र सरकारला 'पाच' गंभीर प्रश्न

दरम्यान, जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश हे देखील या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती मिळते आहे. स्वतः जिल्ह्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य सुरू असून, पोलीस कमिशनर देखील त्याठिकाणी उपस्थित होते.

संबंधित बातम्या