Farmers Protest : आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या ट्विटवर केंद्र सरकारने दिली प्रतिक्रिया  

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता भारत सरकारने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकरी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या या शेतकरी आंदोलनाचे समर्थन अनेक विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी केले असून, या आंदोलनाला पाठिंबा देखील दर्शविला आहे. त्यानंतर पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे. या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता भारत सरकारने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात सरकारने निवेदन जारी करताना, कृषी विधेयकाबाबत सोशल मीडियावरील हॅशटॅग आणि कमेंट्स हे प्रलोभन असल्याचे म्हटले आहे. 

हुकुमशहांची नावं "M" अक्षरापासूनच का सुरू होतात? राहूल गांधींनी केला...

आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने यावर निवेदन प्रसिद्ध करत, आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यक्तींकडून व यात खासकरून सेलिब्रेटींकडून करण्यात आलेले कमेंट्स अचूक आणि जबाबदार पूर्ण नसल्याचे म्हटले आहे. तसेच अशा गोष्टींवर भाष्य करण्यापूर्वी सत्य माहित असणे गरजेचे असल्याचे सरकारने या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या विध्वंस प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या आणि यांपैकी काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे अधोरेखित केले असून, अशाच काही जणांनी जगभरात महात्मा गांधींच्या पुतळ्यांना नुकसान पोहचवले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर हे भारतासाठी आणि जगभरातील सुसंस्कृत समाजासाठी अत्यंत त्रासदायक असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 

दरम्यान, आज पॉप स्टार रिहानाने आपल्या सोशल मीडियावरील ट्विटर अकॉउंट वरून भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत एक पोस्ट शेअर केली. रिहानाने शेतकरी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी इंटरनेटसेवा बंद करण्यात आल्याची एक बातमी पोस्ट करून, आम्ही याबद्दल का बोलत नाही? असे लिहीत, रिहानाने #FarmersProtest हा हॅशटॅग दिला आहे. 

त्यानंतर, जगातील सर्वात लहान पर्यावरण सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने देखील सोशल मीडियाच्या ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले. शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट करताना ग्रेटाने, आम्ही भारतातील शेतकरी आंदोलनासोबत एकत्रित उभे असल्याचे म्हटले आहे. 

रिहाना आणि  ग्रेटा थनबर्ग यांच्यानंतर मिया खलिफाने देखील शेतकरी आंदोलनासंबंधित ट्विट केले. मिया खलिफाने आपल्या ट्विट मध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनाबत हे काय चालले आहे, असा प्रश्न केला आहे. तसेच नवी दिल्लीच्या आसपासच्या भागात इंटरनेट बंद केले आहे? असे देखील मिया खलिफाने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे.            

संबंधित बातम्या