चीनी गुप्तहेराला भारत-बांग्लादेश सीमेवर अटक

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

उत्तरप्रदेश पोलिसांच्या (Uttar Pradesh Police) अँटी टेरर स्क्वॉडने (Anti Terror Squad) जुनवेई आणि त्याच्या साथीदाराला अटके केली आहे.

बांग्लादेश सीमेवर (Bangladesh border) बीएसएफने (BSF) अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या एका चिनी नागरिकाला अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) माल्डामध्ये (Malda) प्रवेश करताना या चीनी नागरिकाला (Chinese citizen) पकडण्यात आले आहे. आत्तापर्यंतच्या तपासातून हा चिनी नागरिक गुप्तहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. हान जुनवेई (Han Junwei) असे या चीनी नागरिकाचे नाव आहे. जुनवेईने चुकीच्या हेतूने भारतीय सीमाभागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Chinese spy arrested at Indo Bangladesh border)

उत्तरप्रदेश पोलिसांच्या (Uttar Pradesh Police) अँटी टेरर स्क्वॉडने (Anti Terror Squad) जुनवेई आणि त्याच्या साथीदाराला अटके केली आहे. चौकशी दरम्यान जुनवेई याने मोठा खुलासा केला की, त्याचा साथीदार दरमहा 10-15 भारतीय सिम कार्ड चीनमध्ये पाठवत होता. जुनवेईने पुढे सांगितले की, गुरुग्रामध्ये त्याचे एक हॉटेल आहे. ज्यामध्ये त्याचे अनेक चीनी साथीदार कार्यरत आहेत.

पत्रकारांच्या अटकेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल तेलंगणात उडाली खळबळ

या चीनी गुप्तहेराचा तपास करण्यात आला असता त्याच्याकडे चायनीज पासपोर्ट, एक अ‍ॅपल लॅपटॉप, 2 आयफोन मोबाईल, 1 भारतीय सीम, 1 बांग्लादेशी सीमकार्ड, 2 चीनी सीमाकार्ड, दोन लहान टॉर्च, पैशांचे व्यवहार मशीन, 2 एटीएम कार्ड, युएस डॉलरसह अन्य वस्तू सापडल्या आहेत.

दरम्यान, 2010 साली तो पहिल्यांदा हैदराबादला (Hyderabad) आला होता. त्यानंतर तो 2019 नंतर तो तीन वेळा दिल्ली आणि गुरुग्राम येथे आला होता. त्याचा सध्याचा पासपोर्ट हा चीनमधील हुबेई प्रातांचा (Hubei Province)आहे. 

संबंधित बातम्या