COVID-19 India: ''कोरोना एक जीव आहे, त्याला जगूद्या''  

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

दरम्यान, देशात मागच्या 24 तासात  2,40,46,809 एवढे रुग्ण आढळले आहेत.

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटामुळे भारतात हाहाकार माजला आहे. दरम्यान, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत (Trivendra Singh Rawat) यांनी कोरोनाबद्दल एक आश्चर्यकारक विधान केले आहे. या वक्तव्यानंतर रावत सोशल मीडियावरही जोरदार ट्रोल झाले आहेत. वास्तविक, त्रिवेन्द्रसिंग रावत यांनी गुरुवारी सांगितले की कोरोना विषाणू हा एक जिवंत प्राणी आहे, ज्याला जगण्याचा अधिकार आहे. रावत टीव्ही चॅनेलशी बोलताना म्हणाले, "तात्विक दृष्टिकोनातून, कोरोना विषाणू देखील एक जीव आहे. इतर लोकांप्रमाणेच त्यालाही जगण्याचा हक्क आहे, परंतु आपण स्वतःला सर्वात बुद्धिमान समजतो आणि त्याला पण संपवत आहोत.  म्हणून तो विषाणू सतत बदलत आहे."(Corona is a creature, let him live)

दहशतवादाचा आरोप असणारा डॉक्टर मागतोय रुग्णसेवेची परवानगी

तथापि, माजी मुख्यमंत्री म्हणाले की, सुरक्षित राहण्यासाठी मानवांना विषाणूपासून पुढे जाणे आवश्यक आहे.त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल रावत यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. रावत यांची ही टीका अशा वेळी आली आहे जेव्हा संपूर्ण देश कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेशी लढा देत आहे. या विषाणूस सेंट्रल व्हिस्टामध्ये आश्रय द्यावा अशी एका ट्विटर वापरकर्त्याने  टीका केली आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत 2,40,46,809 एवढे रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात  37,04,893 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. देशाचा रिकव्हरी दर 83.50 टक्के आहे. मागच्या २४ तासात 3,44,776 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात अनेक राज्यात अजूनही ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होत नाहीये. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  अशातच माजी मुख्यमंत्र्यांच हे विधान वादचं कारण बनलं आहे.     

संबंधित बातम्या