देशात वाढला कोरोनाचा विळखा; महाराष्ट्राची परिस्थिति चिंताजनक

दैनिक गोमंतक
मंगळवार, 30 मार्च 2021

गेल्या चोवीस तासात देशात 56 हजार 211 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 23 मार्च रोजी 56 हजारांपेक्षा कमी म्हणजेच 53 हजार 476 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते.

गेल्या चोवीस तासात देशात 56 हजार 211 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी 23 मार्च रोजी 56 हजारांपेक्षा कमी म्हणजेच 53 हजार 476 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर सोमवारी 271 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर, 37 हजार 28 रुग्ण बरे होऊन घरी गेले. याशिवाय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार,  कालपर्यंत भारतात कोरोना विषाणूचे एकूण 24  कोटी 26  लाख 50  हजार 25 नमुने चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.  त्यापैकी काल सात लाख 85 हजार 864 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

एकट्या महाराष्ट्रात  63 टक्के सक्रिय प्रकरणे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि छत्तीसगड या आठ राज्यांत दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण वाढले आहेत. या 8 राज्यांमधील नवीन प्रकरणांचे प्रमाण सुमारे 86 टक्के आहे. तर चिंताजनक बाब अशी की, या राज्यांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण 63 टक्के इतके आहे.  

पर्यटकांना आवरेना गोव्याचा मोह; ‘दाबोळी’त सरासरी सतरा हजार प्रवाशांची वर्दळ

शाळा-महाविद्यालयांवर परिणाम
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने, प्राथमिक वर्ग बंद केले आहेत. तर दिल्लीव्यतिरिक्त पंजाब, पुददूचेरी, गुजरात, हिमाचल, चंडीगड, छत्तीसगड, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान यासह अनेक राज्यांनीही सध्या लहान वर्गांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब बोर्डाची दहावी बोर्डाची परीक्षा 4 मे आणि बारावीची बोर्ड परीक्षा २० एप्रिलपासून सुरू करणार 
कोरोनाचे वाढते प्रकरण लक्षात घेता पंजाबमधील सर्व शाळा व महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. राज्य मंडळाच्या परीक्षाही तहकूब करण्यात आल्या आहेत. पंजाब बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता 4  मे आणि 20  एप्रिलपासून सुरू होतील. गुजरात सरकारने अहमदाबाद, राजकोट, वडोदरा, सूरत, भावनगर, गांधीनगर, जामनगर आणि जुनागडमधील सर्व शाळांना 10  एप्रिलपर्यंत केवळ ऑनलाइन वर्ग घेण्यास सांगितले आहे. तामिळनाडू सरकारनेही राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

एकूण प्रकरणे - एक कोटी 20 लाख 95 हजार 855
एकूण डिस्चार्ज - एक कोटी 13 लाख 93 हजार 201
एकूण सक्रिय प्रकरणे - 5 लाख 40 हजार 720
एकूण मृत्यू - एक लाख 62 हजार 114
एकूण लसीकरण - 6 कोटी 11 लाख 13 हजार 354 रुपये

संबंधित बातम्या