Corona Update: मी आधीच चेतावणी दिली होती की...

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

देशातील कोरोना व्हायरस च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रकरणावरून कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. भारतातील सर्व लोकांना कोरोना या साथिच्या आजारापासून सावधान राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

नवी दिल्ली: देशातील कोरोना व्हायरस च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या प्रकरणावरून कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. भारतातील सर्व लोकांना कोरोना या साथिच्या आजारापासून सावधान राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. "कोरोना संसर्ग हा देशातील जनतेसाठी अद्यापही मोठा धोका आहे. अशी चेतावणी मी आधीच तुम्हाला दिली होती. म्हणून सर्व जनता खबरदारी घ्या, मास्क वापरायला विसरू नका. आणि कोविड संदर्भातील नियमांचे पालन करा," अशा सुचना राहूल गांधी यांनी आपल्या ट्विट मधून जनतेला केल्या आहेत.

अज्ञात युवकाकडून कमल हासनच्या कारवर हल्ला 

देशातील कोविडच्या परिस्थितीवर राहुल गांधी हे सुरुवातीपासूनच केंद्र सरकारच्या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे करत आले आहेत. या बरोबरच त्यांनी कोरोना आकडेवारी दर्शवित असलेला एक आलेख सुद्धा शेअर केला आहे. या आलेखानुसार गेल्या आठवड्यातील कोरोना संसर्गाची सर्वाधिक वाढ झाल्याचे नोंदविले गेले आहे. या अहवालानुसार वर्षाच्या  12 व्या आठवड्यात 1,55,9090 एवढी कोरोना संसर्गात वाढ झाल्याची नोंद दर्शविली गेली आहे. 

सॅंडस्टॉर्म: चीनी हवामान प्रशासनाने बीजिंगमध्ये येलो अलर्ट जाहीर केला 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार कोविड-19 च्या 26,291 नवीन केसेस समोर आल्या आहेत. या केसेस ची संख्या  मागील 85 दिवसांपासून दररोज वाढत जात आहे. तसेच या नवीन केसेस सोबतच देशातील कोरोना संसर्गाची एकूण  प्रकरणे 11,385,339 झाली आहेत. याव्यतिरिक्त संसर्गामुळे नवीन 118 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे देशामध्ये या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या  1,58,785 वर जाऊन पोहोचली आहे.

संबंधित बातम्या