Corona Vaccination : विदेशी लसींना आता भारतात चाचण्यांची गरज नाही

दैनिक गोमंतक
बुधवार, 2 जून 2021

या कंपन्यांनी भारतात ईयूए (इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन) साठी अर्ज केल्यास तो आम्ही मंजूर करण्यास तयार आहोत, असेही सूत्रांनी सांगितले.  मागणी जास्त असल्याने या दोन्ही लसींना भारतात येण्यास वेळ लागू शकतो. 

नवी दिल्ली : फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) सारख्या विदेशी लसी (Foreign vaccines)  लवकराच भारतात येण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या औषध नियामक मंडळाने अशा लसींसाठी भारतात स्वतंत्र चाचण्या घेण्याची आवश्यकता नाही. या लसींना इतर देशांनी किंवा जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिलेली असेल, त्यांना भारतात ब्रिजिंग चाचण्या घेण्याची गरज भासणार नाही. (Corona Vaccine Foreign vaccines do not need testing in India)

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिझर आणि मॉडर्ना या लसींबाबत कोणीही हरकत असण्याची गरज नाही. या लसी इतर देशांमध्ये देण्यात आल्या आहेत मग आम्हीही तयार आहोत. या कंपन्यांनी भारतात ईयूए (इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन) साठी अर्ज केल्यास तो आम्ही मंजूर करण्यास तयार आहोत, असेही सूत्रांनी सांगितले. मागणी जास्त असल्याने या दोन्ही लसींना भारतात येण्यास वेळ लागू शकतो. 

Corona Vaccine : मोनोक्लोनोल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल जूनपासून गुजरातमध्ये उपलब्ध

फायझर आणि मॉडर्ना या विदेशी कंपन्या असून, ज्यांनी सरकारशी नुकसान भरपाई आणि स्थानिक चाचण्यांमधून सूट मिळावी याबद्दल चर्चा सुरु आहे. सरकारने याच्या गंभीर दुष्परिणाम आणि नुकसानभरपाई याबाबत निर्णय घेतलेला नाही. परंतु स्वतंत्र चाचण्या न घेण्याची मागणी मान्य केली आहे. 

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने लिहिलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, विदेशी लसींच्या  ब्रिजिंग चाचण्या करण्याची अट काढून टाकण्यात आला असून, देशात येणारी विदेशी लस आरोग्य संस्थेने मंजूर केलेली असेल तर त्याची गुणवत्ता आणि स्थिरता भारतात तपासण्याची गरज भासणार नाही.

संबंधित बातम्या