COVID-19 Updates: कोरोनामुळे मृत्यूचा आज पर्यंतचा सर्वात मोठा आकडा; पहा मे महीन्याचा आलेख

दैनिक गोमंतक
बुधवार, 19 मे 2021

सोमवारी देशात पहिल्यांदाच एका दिवसात 4.2 लाखांहून अधिक लोक कोरोना संसर्गावर मात करत बरे झाले होते.

भारतातील कोरोनाची (COVID-19) नवीन (News Cases) प्रकरणे 3 लाखांच्या खाली अली असली, तरी अद्याप धोका कायम आहे. देशातील कोरोनामधील नवीन घटना गेल्या काही दिवसांपासून घटत असल्याचे दिसून येत आहे, परंतु मृत्यूच्या आकडेवारीमुळे परिस्थिती चिंताजनक बनते आहे. कारण कोरोना संसर्गाच्या पीक टाईम मध्ये सुद्धा मृत्यूची आकडेवारी एवढी नव्हती. मंगळवारी देशात एका दिवसात कोरोनामुळे तब्बल 4525 लोकांचा मृत्यू (Deaths) झाला, हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 6 मे रोजी देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण (COVID-19 Patiens) आढळून आले होते आणि 3920 लोक मरण पावले होते. (COVID-19 reached the highest number of deaths)

गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूची 267174 नवीन प्रकरणे झाली आहेत, जी कालच्या तुलनेत जवळपास पाच हजाराने जास्त आहे. तसेच 17 ,मे रोजी  कोरोनाचे 2.63 लाख रुग्ण आढळले होते आणि मृत्यूची संख्याही कमी होऊन 4340 अली होती. आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांची  संख्या आता  25,495,144वर पोहोचली आहे. यापैकी सक्रिय प्रकरणांची संख्या 21,979,703 आहे. तर मंगळवारी 3..89 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी देशात पहिल्यांदाच एका दिवसात 4.2 लाखांहून अधिक लोक कोरोना संसर्गावर मात करत बरे झाले होते.

आयुर्वेदिक डॉक्टरचा कोरोनावरील खास औषधाचा दावा; दवाखान्याबाहेर लोकांची झुंबड

मे मध्ये कोरोनाचा संसर्गाच्या आलेखात कसा चढ-उतार झाला ते समजून घेऊया 
१७  मे 2021: 263,045 नवीन प्रकरणे आणि 4,340 मृत्यू.
16 मे 2021: 281,860 नवीन प्रकरणे आणि 4,092 मृत्यू.
15 मे 2021: 310,822 नवीन प्रकरणे आणि 4,090 मृत्यू
14 मे 2021: 326,123 नवीन प्रकरणे आणि 3,879 मृत्यू
13 मे 2021: 343,288 नवीन प्रकरणे आणि 3,999 मृत्यू.
12 मे 2021: 362,406 नवीन प्रकरणे आणि 4,126 मृत्यू.
11 मे 2021: 348,529 नवीन प्रकरणे आणि 4,200 मृत्यू
10 मे 2021: 329,517 नवीन प्रकरणे आणि 3,879 मृत्यू
9 मे 2021: 366,499 नवीन प्रकरणे आणि 3,748 मृत्यू.
8 मे 2021: 409,300 नवीन प्रकरणे आणि 4,133 मृत्यू
7 मे 2021: 401,326 नवीन प्रकरणे आणि 4,194 मृत्यू.
6 मे 2021: 414,433 नवीन प्रकरणे आणि 3,920 मृत्यू.
5 मे 2021: 412,618 नवीन प्रकरणे आणि 3,982 मृत्यू.
4 मे 2021: 382,691 नवीन प्रकरणे आणि 3,786 मृत्यू.
3 मे 2021: 355,828 नवीन प्रकरणे आणि 3,438 मृत्यू.
2 मे 2021: 370,059 नवीन प्रकरणे आणि 3,422 मृत्यू.
1 मे 2021: 392,562 नवीन प्रकरणे आणि 3,688 मृत्यू

संबंधित बातम्या