परिवर्तनासाठी ममता बॅनर्जींना पराभूत करा : अमित शहा

दैनिक गोमंतक
मंगळवार, 30 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये 1 एप्रिल रोजी  दुसर्‍या टप्प्यातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (30 एप्रिल) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नंदीग्राममध्ये रोड शो करत भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार केला.

पश्चिम बंगालमध्ये 1 एप्रिल रोजी  दुसर्‍या टप्प्यातील मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज (30 एप्रिल) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नंदीग्राममध्ये रोड शो करत भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार केला. फुले व भाजपाच्या झेंड्यांनी सुशोभित झालेल्या लॉरीवर उभे राहून अमित शहा यांनी बेथुरिया ते रायपाडा दरम्यानच्या चार किलोमीटरवरील पूर्व मिदनापूर विधानसभा मतदार संघातील गर्दीला अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले  सुवेंदू अधिकारी देखील होते. रोड शो पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा तूफान गर्दी केली होती. यावेळी जय श्री राम, नरेंद्र मोदी झिंदाबाद, अमित शाह झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. (Defeat Mamata Banerjee for change: Amit Shah) 

‘’जुडासने इसा मसिहाला धोका दिला’’ असं म्हणतं मोंदीचा पिनरयी विजयन सरकारवर... 

सुवेंदू अधिकारी यांच्या समर्थनार्थ जनतेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, ''नंदीग्राममधील जनतेचा उत्साह पाहून भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी येथूनच विजयी होणार,'' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, बंगालमध्ये भाजपा  200 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अमित शहा यांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ''परिवर्तन  घडविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ममता दीदी यांना नंदीग्रामने पराभूत करणे. जनतेसमोर कोणी मुख्यमंत्री नसतो कारण जनताच मुख्यमंत्री निवडते आणि यावेळी यावेळी नंदीग्राममधून भाजपाच निवडणूक जिंकेल. असेही  अमित शहा यांनी म्हटले. 

''मी कुठूनही निवडणूक लढवू शकत होते. पण नंदीग्राममधील मत भगिनींसाठी मी सिंगूर ऐवजी मुद्दाम नंदीग्रामची निवड केली. असं ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. त्याचबरोबर यावेळी त्यांनी सुवेंदू अधिकारी  यांच्या टीकेला प्रत्युत्तरही दिले. 'नंदीग्राम माझे आहे मी इथेच राहणार. मी निवडून आले तर सुवेंदू अधिकारी यांना सोडणार नाही,' असा इशाराच यावेळी ममता बॅनर्जी यांनी दिला. तसेच, भाजपाला राजकारणातून काढा आणि नंदीग्राम व पश्चिमबंगाल मधून हद्दपार करा, शांत डोक्याने मतदान करा, असे आवाहनही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केले. 

विशेष म्हणजे नंदीग्रामच्या संघर्षाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण याठिकाणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणुकीच्या रिंगणात असून भाजपाच्या टिकीटावरून सुवेंदू अधिकारी त्यांच्या विरोधात रिंगणात उभे आहे आहेत. या मतदारसंघात आज (30 मार्च) सायंकाळी पाच वाजता प्रचाराचा संपेल आणि 1 एप्रिल रोजी नंदीग्राममध्ये मतदान होणार आहे. 

संबंधित बातम्या