भारताची संरक्षण सज्जता वाढणार; अर्जुन टॅंकच्या खरेदीला हिरवा कंदील  

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज देशाच्या तिन्ही संरक्षण दलांना शस्त्र आणि उपकरणांच्या खरेदीसाठीची संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) पार पडली. या बैठकीत भारतीय सैन्य दल, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाला आवश्यक असणारी प्रणाली, विविध शस्त्रे व उपकरणांच्या खरेदीसाठीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज देशाच्या तिन्ही संरक्षण दलांना शस्त्र आणि उपकरणांच्या खरेदीसाठीची संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) पार पडली. या बैठकीत भारतीय सैन्य दल, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाला आवश्यक असणारी प्रणाली, विविध शस्त्रे व उपकरणांच्या खरेदीसाठीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यावेळी, संरक्षण दलांच्या गरजेसाठी 13,700 कोटी रुपयांच्या खर्चासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ही खरेदी स्वदेशी भारतीय-आयडीडीएम म्हणजेच स्वदेशी डिझाइन केलेले, विकसीत आणि उत्पादित केलेल्या उपकरणांची करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अर्जुन बॅटल टॅंकच्या नव्या आवृत्तीच्या खरेदीला देखील हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. 

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बंगाली फिल्म इंडस्ट्रीला मोदी सरकारची मोठी भेट

आज पार पडलेल्या संरक्षण खरेदीसाठीच्या बैठकीत खासकरून स्वदेशी उपकरणांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिग्रहणासाठी मंजूर करण्यात आलेले प्रस्ताव स्वदेशी डिझाइन, विकसित व तयार केलेल्या उपकरणांची खरेदीसाठी करण्यात आले आहेत. तसेच यामध्ये इंटरफेस प्लॅटफॉर्म आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) डिझाइन केलेले आणि विकसित केलेल्या प्रणालींच्या समावेशाची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. 

त्यानंतर, भारतीय लष्करासाठी 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्वदेशी बनावटीच्या अर्जुनच्या नवीन विकसित करण्यात आलेल्या टॅंक खरेदी प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच अर्जुन मार्क 1 ए या नवीन आवृत्तीचे 118 टॅंक भारतीय लष्करात दाखल होणार आहेत. व हे टॅंक पुढील 30 महिन्यांच्या आत लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. याशिवाय, नाग अँटी-टँक गाईडेड मिसाईल आणि अरुध्रा मध्यम पॉवर रडारच्या खरेदी प्रस्तावाला देखील या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. नाग अँटी-टँक गाईडेड मिसाईल व अरुध्रा रडार सिस्टीम देखील स्वदेशी आहे. त्यामुळे ही उपकरणे भारतीय सैन्य दलात दाखल झाल्यानंतर भारताच्या संरक्षण सज्जतेत मोठी वाढ होणार आहे. 

संतापलेल्या हत्तीची बसच्या दिशेने धाव; पर्यटकांची उडाली घाबरगुंडी..व्हिडिओ...

दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी रोजी स्वदेशात निर्मिती करण्यात आलेला अर्जुन मार्क 1 ए टॅंक भारतीय सैन्य दलाकडे सोपवला होता. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिणेत तयार करण्यात आलेला हा टॅंक उत्तर भारतात रक्षण करण्यासाठी तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.  

संबंधित बातम्या