प्रोटोकॉलसंबंधीच्या याचिकेवर सुनावणीस नकार; याचिकाकर्त्याला 25 हजाराचा दंड

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 मे 2021

कोविड-19(Covid-19) च्या उपचारासंदर्भातील प्रोटोकॉलमध्ये बदल करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने(Delhi High Court) नकार करताना याचिकाकर्त्याला 25 हजाराचा दंडही ठोठावला.

नवी दिल्ली : कोविड-19(Covid-19) च्या उपचारासंदर्भातील प्रोटोकॉलमध्ये बदल करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने(Delhi High Court) नकार करताना याचिकाकर्त्याला 25 हजाराचा दंडही ठोठावला. याचिकाकर्त्याने म्हटले की, कोविडच्या उपचारात कोणते औषधे घ्यायची याचा उल्लेख आहे. परंतु कोणती औषधे घेऊ नयेत, याबाबत स्पष्ट उल्लेख दिसत नाही.(Delhi High Court refuses to hear public interest litigation seeking change in Covid-19 protocol)

तसेच किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांवर स्टेरॉईड आणि ॲटीबायोटिक्सचा वापर होऊ नये, अशीही मागणी याचिकेत करण्यात आली. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, कोविड उपचार हे प्रोटोकॉलशी निगडित असून त्यासाठी नीती आयोग आणि आयसीएमआर संस्था निर्णय घेण्यास सक्षम आहेत. या दोन्ही संस्थांकडे तज्ञांची फळी आहे. अशा स्थितीत न्यायालय त्यांना निर्देश कसे देऊ शकते.

पाण्यात आढळले कोरोनाचे विषाणू!; ICMR-WHO कडून नाल्यातील पाण्याची चाचणी  

या वेळी केंद्र सरकारकडून सहायक सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा म्हणाले की, सध्याच्या कोणाचा सल्ला ऐकायचा आणि कोणाचा नाही, असे सांगणाऱ्या सल्लागाराची सरकारला गरज वाटू लागली आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, अशा याचिका स्वीकारल्या गेल्या तर देशातील प्रत्येक जण वैद्यकीय उपचार आणि औषधासाठी न्यायालयात धाव घेईल. ही झटपट याचिका एक जनहित याचिका नसून ती एकप्रकारे प्रचारहित याचिका होती.

दरम्यान कोरोनाची दुसरी लाट मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळसह अनेक राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. कोरोनाची दुसरी लाट इतकी भयानक आहे की ती लोकांचा जीव घेत आहे. यावेळी बरेच लोक परिस्थीतीने हतबल आणि असहाय्य दिसत आहेत, तर बरेच लोक आपला जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात विनवणी करीत आहेत. त्याचबरोबर कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांचे काही वेदनादायक फोटोही समोर आहेत. 

corona vaccine: नोबेल विजेत्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या चुकीच्या ट्विटवर विश्वास ठेवू नका; आसाम पोलिसांचे अवाहन 

उत्तर भारतात कोरोनापासून थोडा दिलासा मिळाला,  मात्र दक्षिण भारतात कोरोनाने लोकांची चिंता अधीक वाढविली आहे. तामिळनाडूबद्दल बोलतांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव या राज्यात सातत्याने वाढत आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासात 468 संक्रमित कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतेक मृत्यू चेन्नईमध्ये झाले. मंगळवारी केरळमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 29,803 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि 177 लोकांचा मृत्यू झाला. या साथीच्या रोगाने अनेक लहान मुलेही त्रस्त आहेत. कोरोनाने काही मुलांच्या दोन्ही पालकांचा जीव घेतला आहे. 

संबंधित बातम्या