डॉक्टरांना शिव्या-शाप देण्यापूर्वी घामाने थिजलेल्या 'या' कोरोना योध्याकडे एकदा पहाच

dr. sohil.jpg
dr. sohil.jpg

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. रुग्णालयात बेडस, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, मेडिकलमध्ये सहजा सहजी उपलब्ध असणारी औषधेही मिळेनाशी झाली आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करता करता देशतील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. ऑक्सिजन, रुग्णवाहिका आणि औषध या मूलभूत गोष्टींसाठी लोक संघर्ष करत आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी रुग्णालयांमध्ये दिवसरात्र या साथीचा सामना करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आता स्मशानातही जागा नसल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांना शिव्याशाप देणे, मारहाण करणे अशा घटनाही समोर आल्या आहेत. मात्र कोरोना रुग्णांवर उपचार करणारे अनेक डॉक्टर्सची अवस्थाही खूपच खराब आहे. याचे एक उदाहरण समोर आले आहे.  (The doctor removed the PPE kit and shared the photo; You will be proud of them too) 

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची सत्य स्थिती दर्शवणारा एका डॉक्टरचा एक फोटो  सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पीपीई किट घालून कोरोना रुग्णांवर 14-15 तास उपचार केल्यानंतर काय अवस्था होते,  हे या डॉक्टरने या फोटोमधून दाखवून दिले आहे. डॉक्टर सोहिल यांनी बुधवारी(ता. 28) ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. 'अभिमानाने देशासाठी काहीतरी करत आहे, असे फोटोच्या कॅप्शनमध्ये डॉ. सोहिल यांनी लिहिले आहे. हा फोटो  पोस्ट केल्यानंतर तो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. डॉ. सोहिल यांनी पहिल्या ट्विटमध्ये दोन फोटो पोस्ट केले आहेत. यात पहिल्या फोटोत ते पिपीई किट परिधान केलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत पिपीई किट काढल्यानंतर त्यांचे संपूर्ण अंगच नाही तर त्यांचे कपडेही घामाने भिजलेले दिसत आहेत.  

पुढच्या ट्विटमध्ये यांनी आपल्या सर्व डॉक्टर सहकाऱ्यांना एक संदेश दिला आहे. ज्यात त्यांनी सर्वांना कोरोना लसीकरण करून घेण्याची विनंती केली आहे. 'सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने मी हे सांगू इच्छितो की, आपण आपल्या परिवारापासून दूर राहून खूप कष्ट करत आहोत. कधीकधी आपण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापासून फक्त एक पाऊल दूर असतो तर कधीकधी गंभीर आजारी वृद्ध व्यक्तीपासून एक इंच अंतरावर असतो. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपले  लसीकरण करून घ्या. हा एकच उपाय आहे! सुरक्षित रहा.' असे डॉ. सोहिल यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, डॉक्टर सोहिलच्या यांच्या या ट्विटला 43 हजारांहून अधिक लाईक्स आणि 5 हजाराहून अधिक री-ट्वीट मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रियाही दिली आहे.  तसेच, या कठीण काळात दिवस-रात्र लोकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न करणारे सर्व डॉक्टर आणि कोरोना वॉरियर्स यांना सलाम केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com