बंगाल निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला लागलं ग्रहण; पक्षांतर्गत खडाजंगी बाहेर

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 2 मार्च 2021

बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या युतीवरून कॉंग्रेस पक्षाचे नेते चांगलेच आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या युतीवरून कॉंग्रेस पक्षाचे नेते चांगलेच आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आयएसएफ सोबत पक्षाने केलेल्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेल्या आनंद शर्मा यांनी अधीर रंजन चौधरी यांच्यावर निशाणा साधताना त्यांचे विचार हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. तसेच जे बोललो ते आपल्या चिंतेची अभिव्यक्ती असल्याचे सांगत, कॉंग्रेसच्या विचारसरणीसाठी दृढ वचनबद्ध असल्याचे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. आणि हे सर्वसमावेशक, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष असल्याची पुस्ती आनंद शर्मा यांनी जोडली आहे. इतकेच नाही तर पक्षाचा इतिहासकार आणि विचारवंतांपैकी एक असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. 

आता खासगी क्षेत्रात स्थानिकांना मिळणार 75 टक्के आरक्षण; हरियाणा सरकारचा मोठा...

त्यानंतर, पक्ष व गांधी परिवाराच्या बंडाच्या प्रश्नावर बोलताना, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे. आणि नेतृत्वाविरोधात एक शब्द किंवा टिप्पणी देखील केली नसल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंटशी (आयएसएफ) युती केल्यानंतर आनंद शर्मा यांनी काँग्रेस सांप्रदायिकतेच्या विरोधात निवड करू शकत नसल्याचे म्हटले होते. आणि काँग्रेसला सर्व प्रकारच्या जातीयवादाशी लढावे लागणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. एवढेच नाही तर, पश्चिम बंगाल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांची उपस्थिती आणि पाठिंबा हे लज्जास्पद असल्याचे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे असल्याचे आनंद शर्मा यांनी म्हटले होते. 

याशिवाय, आयएसएफ आणि यांसारख्या इतर पक्षांशी कॉंग्रेसची युती ही पक्षाच्या मूळ विचारधारा, गांधीवाद आणि नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात असल्याचे सांगत यामुळे काँग्रेसचा आत्माच संपुष्ठात येणार असल्याचे वक्तव्य आनंद शर्मा यांनी केले होते. तसेच या विषयांवर कॉंग्रेस कार्यकारिणीवर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत आनंद शर्मा यांनी व्यक्त केले होते. तर दुसरीकडे बंगाल कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आनंद शर्मा हे पक्षाचे हित विसरून नुकसान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.   

याव्यतिरिक्त, आनंद शर्मा यांनी केलेली टीका भाजपच्या अजेंड्याच्या अनुरुप असल्याचे म्हणत, त्यांचा बिग बॉस कोण  आहे ते माहित असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी आज म्हटले आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतून नुकतेच निवृत्त झालेले गुलाम नबी आझाद यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवताना, काँग्रेस पक्षातील असंतुष्ट असलेल्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक बंद करण्याचा सल्ला अधीर रंजन चौधरी यांनी आनंद शर्मा यांना दिला. आणि आयएसएफ सोबत जागांवरून सरळ बोलणी झाली नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले. 

अमेरिका रशियावर निर्बंध घालण्याच्या तयारीत; जाणून घ्या कारण

अधीर रंजन चौधरी यांच्यानंतर, तारिक अन्वर यांनी देखील आनंद शर्मा यांच्यावर टीका केली आहे.  तारिक अन्वर यांनी आयएसएफ ही सांप्रदायिक नसून, धार्मिक संगठन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि त्यांची धोरणे देखील सांप्रदायिक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या विषयावर ट्विट करण्याऐवजी आनंद शर्मा यांनी अधीर रंजन चौधरी यांच्याशी थेट बोलले पाहिजे होते, असेही तारिक अन्वर म्हणाले आहेत. आणि पक्षाच्या नेत्यांना बाहेरून नव्हे तर पक्षाच्या व्यासपीठावर मत मांडण्याचा अधिकार असल्याचा टोला देखील तारिक अन्वर यांनी आनंद शर्मा याना लगावला. 

संबंधित बातम्या