‘सीबीएसई’च्या परीक्षा ४ मे पासून

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी गुरुवारी 31डिसेंबर रोजी जाहीर केले की सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा 4 मे ते 10 जून 2021 या कालावधीत घेण्यात येतील.

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा १० जूनपर्यंत संपविण्याचा प्रयत्न आहे

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी गुरुवारी 31डिसेंबर रोजी जाहीर केले की सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा 4 मे ते 10 जून 2021 या कालावधीत घेण्यात येतील.

लाइव्हवर बोलताना डॉ. पोखरीयाल म्हणाले की, बोर्ड उत्तरपत्रिका वेळेवर तपासण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच या बोर्ड परीक्षांचे निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची त्यांची अपेक्षा आहे. 1 मार्चपासून सीबीएसई प्रॅक्टिकल सुरू होतील, असेही त्यांनी नमूद केले.

सीओएसई बोर्डाची परीक्षा २०२१ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार नाही, असे पोखरीयाल यांनी पूर्वी सांगितले होते.

आणखी वाचा:
नववर्षात देशाच्या मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला मिळणार बूस्टर डोस..! -

संबंधित बातम्या