जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेत आता 'तरंगणारी अम्ब्युलन्स'

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

तरंगणारी अ‍ॅम्ब्युलन्स बनविण्यात तारिकलाही बर्‍याच अडचणी आल्या.

संपूर्ण देश कोरोना विषाणूसोबत (Coronavirus) दोन हात करत आहे. अशा परिस्थितीत असे बरेच लोक आहेत जे लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यापैकी एक जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) तारिक अहमद पतलू आहे, ज्यांनी श्रीनगरमधील डाल तलावावर बोटीला रुग्णवाहिका बनविली. ज्याद्वारे तारिक अहमद कोरोनाचे रुग्ण एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यास मदत करतो. जेव्हा ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होते तेव्हा कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. त्यामुळे तारिकने हे काम सुरू केले आहे. ('Floating ambulance' now serving corona patients in Jammu and Kashmir)

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत...

जेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाला तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यास कोणीही मदत केली नाही, म्हणून जेव्हा तो बरा झाला तेव्हा त्याने निर्णय घेतला की तो रुग्णवाहिका बनवून लोकांची सेवा करणार. ज्यामुळे लोकांना डल लेक मार्गे  रुग्णालयात दाखल होण्यास मदत होईल.ही तरंगणारी अ‍ॅम्ब्युलन्स बनविण्यात तारिकलाही बर्‍याच अडचणी आल्या. तथापि, त्याच्या कठोर परिश्रमाचा परीणाम झाला आणि तो यशस्वी झाला. तारिक म्हणाला आज तो डाल तलावाच्या मार्गाने रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत करीत आहे.

त्यांनी ही तरंगणारी अ‍ॅम्ब्युलन्स स्वत:च्या खर्चाने बोटीवर तयार केली आणि आज तो डाल तलावाच्या परिसरात राहणाऱ्या रूग्णांना आणीबाणीच्या वेळी रुग्णालयात मोफत नेण्यासाठी मदत करीत आहे. तारिक म्हणाला "वाढत्या रुग्णांनामुळे रुग्णालये आणि घरांची परिस्थिती लक्षात घेता, मी लोकांसाठी ही सुविधा स्थापित केली आहे, ज्यात पीपीई किट, स्ट्रेचर्स आणि व्हीलचेअर्सचा समावेश आहे."

संबंधित बातम्या