राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत अर्थव्यवस्था 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते आणि वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाच्या स्मरणार्थ भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते आणि वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाच्या स्मरणार्थ भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो.  यंदाच्या  हा 30 वा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन  आहे. आजचा दिवस हा देशातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीची आठवण म्हणून काम करतो. 1998 मध्ये आजच्या दिवशी  भारताने राजस्थानमधील पोखरण येथील चाचणी परिक्षेत्रात शक्ती-I या अण्वस्त्र प्रक्षेपाची यशस्वी चाचणी केली होती. या मोहिमेचे नेतृत्व भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. त्यानंतरच्या काही दिवसांत, ऑपरेशन शक्ती उपक्रमांतर्गत देशाने आणखी दोन अण्वस्त्र चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. या चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताला अण्वस्त्र राष्ट्र म्हणून घोषित केले आणि यानंतर भारत अण्वस्त्र धारी देशांच्या यादीत सहाव्या क्रमांकाचा देश ठरला.  (National Technology Day: Sustainable economy with the help of technology and science) 

गोव्याच्या जनतेच्या मनावर राज्य करणारे मुस्लीम समाजातील पहिले मंत्री

अणुचाचण्यांव्यतिरिक्त, याच  दिवशी (11 मे) भारताने कर्नाटकच्या बेंगलुरूमध्ये येथील राष्ट्रीय अवकाश संशोधन प्रयोगशाळेने डिझाइन केलेले पहिले स्वदेशी विमान ‘हंस -3’ची यशस्वी चाचणी केली. लाइट टू सीटर विमान हे पायलट प्रशिक्षण, पाळत ठेवणे आणि इतर कामांसाठी वापरले जाते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) देखील आजच्याच दिवशी  भारताच्या पृष्ठभागावरुन एअर त्रिशूल क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करून आजच्या दिवसांत मोलाची भर घातली.  त्रिशूल क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर हे भारतीय सैन्य व हवाई दलात सामील करण्यात आले.  आजच्या दिवशी भारतात सर्व तांत्रिक प्रगती होत असल्याने केंद्र सरकारने 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केले. तेव्हापासून 1999  पासून दरवर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, तंत्रज्ञान विकास मंडळ (टीडीबी) आजचा दिवस रक्षत्री तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी टीडीबी आणि ज्या कंपन्यांच्या तंत्रज्ञान मंडळाने पाठिंबा दर्शविला आहे अशासाठी देशभर विविध सेमिनार आणि कार्यशाळेचे आयोजन केले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज गोव्यासह कोकणाची टेहळणी हनुमंत गडावरून करायचे

तंत्रज्ञान विकास मंडळ दरवर्षी आजच्या दिवसाची एक संकल्पना (थीम)  जाहीर करते. त्यानुसार आजच्या दिवसाची थीम  "तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत अर्थव्यवस्था' अशी आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त ज्यांनी तंत्रज्ञानात  क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे, त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही दिला जातो. तसेच भारताला स्वावलंबी राष्ट्र बनवण्यावर सरकारचे लक्ष असून, देशाच्या विकासासाठी व्यापार  तंत्रज्ञानावरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. 
 

 

संबंधित बातम्या