Corona Update : महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय  

दैनिक गोमन्तक
रविवार, 4 एप्रिल 2021

देशातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची नवी प्रकरणे वाढतच चालल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये कोरोनाचा कहरच सुरु झाल्याचे दिसत आहे.

देशातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची नवी प्रकरणे वाढतच चालल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये कोरोनाचा कहरच सुरु झाल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोरोना साथीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन मध्य प्रदेश राज्य सरकारने कडक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मध्य प्रदेश मधील सरकारने महाराष्ट्राला लागून असलेली सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर छत्तीसगड मधून होणाऱ्या प्रवासावर देखील लवकरच रोख लावण्यात येणार असल्याचे मध्य परदेश सरकारने म्हटले आहे. (The government of Madhya Pradesh has decided to close the border with Maharashtra due to Corona)

ममता बॅनर्जी यांचे आरोप तथ्यात्मक दृष्ट्या चुकीचे - निवडणूक आयोग  

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज, मध्यप्रदेशच्या शेजारील राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती अधिकच चिंताजनक बनल्याचे सांगितले. खासकरून, महाराष्ट्र आणि छत्तीसगड मध्ये परिस्थिती अधिकच गंभीर झाल्याचे त्यांनी नमूद करत, महाराष्ट्र सोबतची सीमा बंद करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. शिवाय, पढील काही दिवसात छत्तीसगड लगतची सीमा देखील बंद केली जाणारा असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. 

याशिवाय, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यात मास्क परिधान न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. तसेच लॉकडाउन करण्यात आलेल्या ठिकाणी देखील लसीकरण सुरु राहणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर इंदोर मध्ये कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रकरणांमुळे 10 हजार खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्याचे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आपत्कालीन परिस्थितीची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील रूग्णालयात अधिक बेड आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा सुनिश्चित केला जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील पुणे शहरात सर्व मॉल व सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मागील चोवीस तासात ४९ हजाराहून अधिक कोरोनाची नवी प्रकरणे समोर आली होती.        

संबंधित बातम्या