दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सीबीएससी'चा मोठा निर्णय 

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील इयत्ता दहावी च्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. तर बारावीच्या परीक्षा 1 जून पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील इयत्ता दहावी च्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. तर बारावीच्या परीक्षा 1 जून पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीचे निकाल राज्य शिक्षण मंडळाने विकसित केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे तयार केले जातील. तर इयत्ता 12 वी च्या परीक्षा नंतर घेण्यात येतील, 1 जून रोजी मंडळामार्फत परिस्थितीचा आढावा घेऊन इयत्ता 12 वीच्या परीक्षांबबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोरखियाल निशंक यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे देशभरातील विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे. ( Important news for 10th to 12th grade students; CBSC's big decision) 

महीलेने कार चालवताना मोबाईलवर कोरोना रिपोर्ट पहिला आणि घडला अनर्थ

दरम्यान, गोव्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (जीबीएसएचएसई) गेल्या आठवड्यात  दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 2020-21 वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. जीबीएसएचएसईने जाहीर केलेल्या तारखांनुसार उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एचएसएससी) बोर्डाची परीक्षा 24 एप्रिल ते 17 मे  या कालावधीत नियोजित होती. तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा 19 मे ते 2 जून या कालावधीत घेण्यात येणार होती.  जीबीएसएचएसईचे अध्यक्ष भागीरथ शेट्टी यांनी दहावी बारावी परीक्षांबाबत माहिती दिली होती. त्याचबरोबर परीक्षेदरम्यान,  मास्क लावणे,  शारीरिक अंतर राखणे, वर्ग व केंद्रे स्वच्छ करणे, विशेष वैद्यकीय पथक, कंटेन्ट झोनमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद या काही बाबी परीक्षेच्या वेळी पाळण्याचे आदेशही देण्यात आले होते. तथापि, यावर्षी राज्यभरातून तब्बल 19, 241 विद्यार्थी बारावीची तर 24,000 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.  मात्र आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाने सर्व विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे. 

महाराष्ट्र राज्य सरकार दहावीची परीक्षा रद्द करणार नाही 
त्याचबरोबर, गोव्याच्या शेजारचे राज्य असलेल्या महाराष्ट्रातही  कोरोनाची परिस्थिती खूपच चिंताजनक झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता तेथील शिक्षण विभागानेही दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात 23 एप्रिल ते 21 मे,  2021  या कालावधीत बारावीची परीक्षा होणार होती. तर 29  एप्रिल ते 20 मे 2021  या कालावधीत दहावीची परीक्षा होणार होती. मात्र राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी  परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात या वर्षी सुमारे १५ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत तर सुमारे 17 लाख विद्यार्थी यावर्षी दहावीची परीक्षा देणार होते.  तथापि, केंद्र सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी राज्यसरकार दहावीची परीक्षा रद्द करणार नाही,  असा निर्णय  महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. 

संबंधित बातम्या