रेल्वेकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवीन नियमावली जाहीर

दैनिक गोमंतक
शनिवार, 17 एप्रिल 2021

रेल्वे स्थानक तसेच रेल्वेतून प्रवास करताना मास्कचा वापर न केल्यास प्रवाशाला 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.​

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचे आकडे झपाट्याने वाढत असल्याने देशातील अनेक राज्यांत लॉकडाऊन सारखे निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र कडक निर्बंध लावून देखील अनेक राज्यांत कोरोना रुग्णवाढीचा दर कमी नाहीये. त्यातच आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने नवीन नियम लागू केले आहेत. (Indian Railways has introduced new rules to prevent corona infection)

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून वेगेवगेळे नियम लागू केले जास्त असतानाच आता वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने जरी केलेल्या नवीन नियमावलीनुसार रेल्वे स्थानक तसेच रेल्वेतून प्रवास करताना मास्कचा वापर न केल्यास प्रवाशाला 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. एवढेच नाही तर, रेल्वेमध्ये किंवा रेल्वेस्थानक परिसरात थुंकल्यास अथवा घाण केल्यास देखील 500 रुपयांचा दंड (Fine) आकारण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना (coro संसर्ग आणि स्वच्छतेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे पाहायला मिळते आहे. तर रेल्वे आणि रेल्वेस्थानकाच्या परिसरात पसरणाऱ्या कचरा आणि घाणीमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो, तो धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.  

कुंभमेळा: मोदींच्या आवाहानाला स्वामी अवधेशानंद यांचे उत्तर

दरम्यान, भारतीय रेल्वेकडून (Indian Rail) सर्व अधिकाऱ्यांना या नवीन नियमावलीची माहिती देण्यात आली नसून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry of India) सर्व सूचना आणि आदेशांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या मार्फत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे समजते आहे. 

संबंधित बातम्या