तेल उत्पादक 'ओपेक' आणि 'ओपेक इतर' देशांना भारताचे मोठे आवाहन 

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील तेलाची मागणी कमी झाल्यामुळे काही तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील तेलाची मागणी कमी झाल्यामुळे काही तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला होता. मात्र त्यानंतर आता जागतिक बाजारपेठेत पुन्हा तेलाची मागणी वाढली असल्यामुळे तेलाचे भाव देखील पुन्हा वधारात असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि याच कारणामुळे भारताने तेल उत्पादक देशांना गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेली उत्पादन कपात कमी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आज जागतिक बाजारपेठेतील क्रूड तेलाची मागणी लक्ष्यात घेता तेलाचे उत्पादन पुन्हा वाढवण्याची विनंती तेल उत्पादक देशांना केली आहे. (Indias big appeal to oil producing OPEC and other OPEC countries)

"आपण फक्त मदत केली"; आसाम ईव्हीएम प्रकरणावर भाजप उमेदवाराचे...

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आज याबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेली  कच्च्या तेलाची उत्पादनातील घट कमी करण्यासाठी ओपेक आणि ओपेक इतर देशांना भारत आवाहन करत असल्याचे अरिंदम बागची यांनी सांगितले. याशिवाय, जगातील तेलाचा पुरवठा हा कृत्रिमरित्या हाताळण्याऐवजी बाजारावर नियंत्रित असावा यावर विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर जगातील तेल उत्पादक असलेले ओपेक आणि ओपेक इतर देश यांनी तेलाच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला तरी, या देशांकडून कोरोनाच्या पूर्वीप्रमाणे तेलाचे उत्पादन पूर्ववत करण्याची अपेक्षा असल्याचे अरिंदम बागची यांनी सांगितले. 

यापूर्वी, तेल उत्पादनातील कपातीसाठी भारताने तेल सौदी अरेबियाला विनंती केली होती. मात्र भारताच्या या विनंतीवर सौदी अरेबियाने कोणताच निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर, भारताने आपल्या सर्व सरकारी रिफायनरीजना सौदीबरोबरच्या कच्च्या तेलाच्या खरेदीसंबंधीच्या कराराचा आढावा घेण्यास सांगितले आहे. तसेच कंपन्यांना चांगल्या अटींवर हा करार अंतिम करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, भारत आपल्या इंधनाच्या गरजेच्या 85 टक्के आयात करतो. त्यामुळे जागतिक स्तरावरील पुरवठ्याचा थेट परिणाम भारतातील दरावर होतो. कोरोना काळात तेल उत्पादक देशांनी मागणी घटल्यामुळे आणि किंमती अत्यंत खालच्या पातळीवर गेल्यामुळे तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर तेलाची मागणी सामान्य झाल्यानंतरही तेल उत्पादक देशांनी कपात सुरूच ठेवल्याने कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली. याच पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात भारताने सौदी अरेबियाला उत्पादनावरील कपातीचा पुनर्विचार करण्याचे आणि उत्पादन वाढविण्याचे म्हटले होते. शिवाय, यामुळे तेलाच्या किमती नियंत्रणात राहणार असल्याचे भारताने नमूद केले होते. परंतु, भारताच्या या आवाहनावर सौदी अरेबियाने दुर्लक्ष करत याउलट राखीव तेलसाठा  वापरण्याचा सल्ला दिला होता.    

 

 

संबंधित बातम्या