गौतम गंभीरचा स्तुत्य उपक्रम 'जन रासोई' मध्ये मिळणार फक्त एक रूपयात जेवण

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

गौतम गंभीरने त्यांच्या पूर्व दिल्लीतील लोकसभा मतदारसंघात गरजूंना एक रुपयात दुपारचे जेवण देणा'ऱ्या 'जन रासोई' कॅन्टीनचा शुभारंभ केला आहे.

नवी दिल्ली: क्रिकेट क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीरने राजकारणात प्रवेश केला. भाजपचे खासदार असलेल्या गौतम गंभीरने त्यांच्या पूर्व दिल्लीतील लोकसभा मतदारसंघात गरजूंना एक रुपयात दुपारचे जेवण देणा'ऱ्या 'जन रासोई' कॅन्टीनचा शुभारंभ केला आहे. लॉकडॉउनमध्ये देखिल गंभीरने गरीबांना मजुर केली होती.

मंगळवारी गंभीरनं आपल्या मतदार संघातील गांधी नगर परीसरातील अशा पहिल्या 'जन रासोई' कॅन्टीनचं उद्घाटन केल, त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्यादिवशी अशोक नगर येथे दुसर्‍या कॅन्टीनचे उद्घाटन करण्यात येऊल अशी माहीती दिली. जेवणात मसुर दाळ, भात आणि भाजी असा आहार असणार आहे.

पूर्व दिल्लीतील 10 विधानसभा मतदारसंघात किमान एक 'जन रासोई' कॅन्टीन उघडण्याची योजना गंभार ने आखली आहे. एका वेळी  100 लोकं बसू शकतील असं हे कॅंटीन असणार आहे पण कोरोना आजारामुळे सध्या केवळ 50 लोकांना परवानगी मिळणार आहे.

 “मला नेहमीच असे वाटले आहे की जाती, धर्म किंवा आर्थिक परिस्थिती विचारात न घेता निरोगी आणि आरोग्यदायी अन्न प्रत्येकाला हक्काने मिळायला हवं  दिवसभरात बेघर आणि निराधार लोकांना जेवण मिळू न शकल्याने मला खरोखर वाईट वाटते, असे मत गंभीरने व्यक्त केले.

आणखी वाचा:

आता हेच बघायचं बाकी होतं बीअर मॅगी ची सोशल मिडियावर रंगलीय चर्चा - 

 

 

संबंधित बातम्या