नवे कामगार कायदे: कामगारांना मिळणार ओव्हरटाईमचे पैसे

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

कामगार मंत्रालय पुढील आर्थिक वर्षात नवीन कामगार नियम लागू करण्याची तयारी करत आहे. सरकार या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्याचे काम करीत आहे.

नवी दिल्ली: कामगार मंत्रालय पुढील आर्थिक वर्षात नवीन कामगार नियम लागू करण्याची तयारी करत आहे. सरकार या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्याचे काम करीत आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर देशाच्या कामगार बाजारामध्ये सुधारित नियम सुरू होणार आहे. यासह, नवीन कामगार कायद्यांमुळे निर्माण झालेल्या शंका दूर करण्याचा देखील सरकार प्रयत्न करीत आहे.

15 मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाइम

मिळालेल्या माहितीनुसार सरकार नवीन कामगार कायद्या अंतर्गत कामाची सध्याची मर्यादा बदलू शकते आणि नियोजित तासांपेक्षा 15 मिनिटे जास्त काळ काम केल्यास ते ओव्हरटाईम मानले जाणार आहे. आणि यासाठी कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांना पैसे द्यावे लागतील. म्हणजेच, कामाचे तास संपल्यानंतर आपण 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केले तर कंपनी त्यासाठी आपल्याला पैसे देईल. जुन्या नियमांनुसार ही वेळ मर्यादा आधी अर्धा तास होती.

या महिन्याच्या अखेरीस प्रक्रिया पूर्ण केल्या जातील

या नियमाशी संबंधित अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कामगार मंत्रालयाने नवीन कामगार कायद्यांबाबत सर्व भागधारकांशी सल्लामसलत केली असून या महिन्याच्या अखेरीस सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. यानंतर नियमांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली जाईल.

पीएफ आणि ईएसआय नियम

नव्या कायद्यात कंपन्यांना सर्व कर्मचार्‍यांना पीएफ आणि ईएसआयसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. नवीन नियमांनुसार कंपनी कंत्राटदाराद्वारे आली आहे असे कारण देवू शकत नाही. याशिवाय कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्यांना पूर्ण वेतन मिळेल, याची खात्री मुख्य कंपन्यांद्वारे केली जाईल.

मध्य प्रदेशात भीषण अपघात; बस कालव्यात पडून 39 प्रवाशांचा मृत्यू -

संबंधित बातम्या