विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्यावेळी सभागृह बनले रणांगण

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्यावेळी आज विधान परिषदेचे सभागृह रणांगण बनले. परिषदेच्या सभापतीपदावरून कॉंग्रेस -भाजप सदस्यांदरम्यान अभूतपूर्व गदारोळ झाला

बंगळूर: विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्यावेळी आज विधान परिषदेचे सभागृह रणांगण बनले. परिषदेच्या सभापतीपदावरून कॉंग्रेस -भाजप सदस्यांदरम्यान अभूतपूर्व गदारोळ झाला. शाब्दिक चकमक, धक्काबुकी, शिवीगाळ आदी प्रकारांनी विधान परिषदेच्या सभागृहाने प्रथमच खालची पातळी गाठली. 

सकाळी कामकाजाला सुरवात झाली. यावेळी उपसभापती जेडीएसचे धर्मगौडा सभापतींच्या स्थानावर बसलेले पाहून कॉंग्रेस सदस्य संतप्त बनले. उपसभापतींना आसनावरून उठविण्यासाठी कॉंग्रेस सदस्य त्यांच्या आसनाकडे गेले. त्याला भाजप सदस्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर भाजप आणि कॉंग्रेस सदस्यांमध्ये हाणामारी झाली.कॉंग्रेसचे सदस्य बसवराज पाटील इटगी यांना सभापतीस्थानवर बसवून कामकाज चालविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला. सभापतीविरोधातील अविश्वास ठराव प्रथम प्रस्तावित करावा, अशी मागणी जेडीएस-भाजप सदस्यांनी केली व ते घोषणा देऊ लागले.

शेट्टी यांना हटविण्याची धडपड
कॉंग्रेस-जेडीएस काळात कॉंग्रेसचे प्रतापचंद्र शेट्टी सभापती झाले.सभापती सहकार्य करीत नसल्याच्या भावनेतून भाजपने त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न चालविला आहे. सध्या भाजपचे बहुमत नाही. जेडीएसने कॉंग्रेसची साथ सोडून भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचे सभापती शेट्टी यांना पदावरून हटविण्याची धडपड सुरू आहे.  

आणखी वाचा:

लॉकडाउनमुळे वाहनउद्योग पंक्चर - 

संबंधित बातम्या