उद्यापासून ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले; बागेत 64 प्रजातीचे 15 लाख फुले

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

शियातील सर्वात मोठे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन देखील बंद होते. मात्र आता चांगली बातमी अशी आहे की हे ट्यूलिप गार्डन उद्या म्हणजेच 25 मार्चपासून  सर्वसामान्यांसाठी उघडले जाणार आहे.

जम्मू: जम्मू-काश्मीरमधील लोकांसाठी उद्याचा दिवस अतिशय खास असणार आहे. कोरोना महामारीनंतर आणि लॉकडाउन लागू झाल्यानंतर देशातील सर्वच उद्याने काही दिवस बंद होते. दरम्यान, आशियातील सर्वात मोठे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन देखील बंद होते. मात्र आता चांगली बातमी अशी आहे की हे ट्यूलिप गार्डन उद्या म्हणजेच 25 मार्चपासून  सर्वसामान्यांसाठी उघडले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्विट

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे ज्यात त्यांनी लिहिले आहे की 25 मार्चचा दिवस जम्मू-काश्मीरसाठी खूप खास आहे. उद्यापासून जब्बारवान पर्वताच्या पायथ्याशी वसलेले ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले होणार आहे. लोकांना बागेत बहरलेल्या 64 पेक्षा जास्त प्रकारची 15 लाखापेक्षा अधिक फुले पहायला मिळणार आहे.

स्वस्तात फ्लाइट बूकिंगची संधी; मिळतोय मोठा डिस्काउंट 

तारीख पुढे वाढविली जाऊ शकते

डल झीलच्या किनाऱ्यावरील ट्यूलिप गार्डनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व पर्यटकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल. सॅनिटायझींग देखील केले जाणार आहे. पर्यटकांना पाणी पिण्यासाठी बागेत वॉटर एटीएम आणि आरओ बसविण्यात आले आहेत. उद्यापासून ट्यूलिप गार्डन उघडण्याची योजना आहे मात्र जर हवामान चांगले नसले तर बाग उघडण्याची तारीख पुढे वाढविली जाऊ शकते, असे फलोरीकल्चर विभागाचे संचालक फारूक अहमद यांनी सांगितले.

बुकिंग डेस्टिनेशन म्हणून गोवा पर्यटनास सर्वाधिक पसंती

असे असणार नियम

बाग उघडण्याची संपूर्ण व्यवस्था व तयारी करण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पर्यटकांना खाण्यापिण्याच्या वस्तू आत नेता येणार नाही. बागेच्या आतच कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असणार नाही. असे त्यांनी सांगितले. या बागेला प्लॅस्टिकमुक्त क्षेत्र घोषित केल्यामुळे बागेत पॉलिथीन किंवा प्लास्टिक पिशव्या नेण्यास परवानगी नाही. जर एखाद्याला जेवण करायचे असेल किंवा स्नॅक्स खायचे असेल तर  बागेच्या बाहेर जावून खावे लागेल. पिण्यासाठी आत पाणी उपलब्ध होईल. लोकांना मास्कशिवाय बागेत प्रवेश मिळणार नाही. सामाजिक अंतर पाळणे अनिवार्य केले आहे. 

संबंधित बातम्या