मेट्रो मॅन ई श्रीधरन यांची राजकारणात एंट्री; या पक्षात करणार प्रवेश

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

देशात मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई श्रीधरन लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत.

देशात मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई श्रीधरन लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. ई श्रीधरन हे 21 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षात सामील होणार आहेत. केरळ मधील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली पक्ष 21 फेब्रुवारीपासून विजय यात्रा काढणार आहे. आणि या यात्रेच्या वेळेस मेट्रो मॅन ई श्रीधरन हे भाजपामध्ये सामील होणार आहेत. 

सर्वसामान्यांना दिलासा; कोणताही नवीन कर भरावा लागणार नाही

ई श्रीधरन यांना देशात मेट्रो रेल्वेमध्ये केलेल्या महत्वपूर्ण कामामुळे मेट्रो मॅन म्हणून पाहिले जाते. दिल्ली मेट्रोच्या जवळपास प्रत्येक टप्प्याचे काम ई श्रीधरन यांनी वेळेच्या आधी पूर्ण केले होते. आणि मेट्रोसारख्या परिवहन माध्यमातील त्यांच्या या योगदानामुळे 2001 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने ई श्रीधरन यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे ई श्रीधरन आता राजकारणात उतरणार असल्यामुळे त्यांच्याकडून वेगळे काहीतरी करून दाखवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान, 2019 मध्ये ई श्रीधरन यांनी लखनऊ मेट्रो रेल्वे कॉपरेशनच्या मुख्य सचिव पदाचा स्वास्थ्य संबंधित कारणामुळे राजीनामा दिला होता. आणि त्यानंतरच ई श्रीधरन हे राजकारणात उतरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

संबंधित बातम्या