ही' चुक देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत; डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले कारण  

dr. randip guleria.jpg
dr. randip guleria.jpg

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने  चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड 19 ची नवीन प्रकरणे दररोज उच्चांक गाठत आहेत. आज देशभरात 2  लाख  34 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.  तर गेल्या  24  तासांत 1341  मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाची लाट दिवसागणिक धोकादायक बनत चालली आहे. अशा परिस्थितीत, देशात कोरोनाची दुसरी लाट का आली, याचे कारण  एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे.  देशात कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची अनेक कारणे आहेत. परंतु याची दोन मुख्य कारणे आहेत. जानेवारी / फेब्रुवारी महिन्यात देशात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आणि नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे थांबवले.  नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन नाही त्यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि आता हा विषाणू उत्परिवर्तित झाला  असून तो अधिक वेगाने पसरत आहे, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटल आहे. (This' mistake caused the second wave of corona in the country; Dr. Randeep Guleria explained the reason)

याहून चिंताजनक बाब म्हणजे वाढती कोरोना प्रकरणांमुळे आता आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे आम्हाला रुग्णालयांमध्ये बेड/ आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांच्या संख्येतही वाढ करावी लागत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आता नागरिकांनीच काळजी घेतली आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असतानाही आपल्या देशात बरेच धार्मिक उपक्रम होत असून निवडणुका देखील सुरू आहेत.  मात्र सध्या नागरिकांचा जीवही महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता आपल्याला देशातील कोरोनाची लाट प्रतिबंधित करायची आहे. यासाठी आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. सध्याच्या घडीला, कोणतीही लस 100%  प्रभावी नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.  

डबल उत्परिवर्ति (डबल म्यूटेंट) भारतातील सर्वाधिक वेगाने पासरणारा म्यूटेंट 
भारतातील सर्व उत्परिवर्ती कोविड -19  रूपांमध्ये डबल उत्परिवर्तित (डबल म्यूटेंट) व्हायरस बी.1.617 चा संसर्ग हा सर्वात जास्त प्रमाणात होत आहे. जागतिक डेटाबेसमध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या जीनोम सिक्वेंसींग डेटामध्ये दिलेल्या माहितीनुसार,  2 एप्रिलपूर्वी 60 दिवसांच्या आत अनेक देशांमध्ये 24 टक्के नमुन्यांमध्ये डबल म्यूटेंट विषाणूचे सर्वाधिक प्रमाण आढळून आले आहे. इ.1.617 व्हेरिएंट प्रथम महाराष्ट्रात दिसून याला आणि E484Qआणि L452R असे दोन भिन्न व्हायरस रूपांचे उत्परिवर्तन झाले. स्क्रिप्स रिसर्चच्या शास्त्रज्ञांच्या केलेल्या आकलनानुसार, 13 टक्के नमुन्यांसह, यूकेतील  प्रकार  इ.1.1.7 हा दुसरा सर्वाधिक प्रचलित प्रकार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com