मोदी सरकारची मोठी घोषणा! कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबाला मिळणार 5 लाखाची मदत

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 मे 2021

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक परिवारस 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) वाढत असताना आत्तापर्यंत लाखो कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे कित्येक कुटुंबियांचा आधार गमावला आहे.  यामध्ये सामान्या नागरिकांपासून ते अगदी कोरोना योध्दे, शासकीय कर्मचारी, सेलिब्रिटी आणि पत्रकारांचा (Journalist) देखील समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Govt of India) एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबासाठी प्रत्येकी 5 लाख रुपयाची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या बाबतचे एएनआयने वृत्त दिले आहे.  गुरुवारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत (Journalist Welfare Scheme of I&B Ministry) प्रत्येक परिवारस 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. (Modi government's big announcement The families of 67 journalists who died due to corona will get Rs 5 lakh assistance)

पाण्यात आढळले कोरोनाचे विषाणू!; ICMR-WHO कडून नाल्यातील पाण्याची चाचणी

मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास (Raghubar Das) यांनी देखील अशा कुटुंबासाठी सहायता निधी देण्याची मागणी केली होती. मोदी सरकारने देखील हा मुद्दा गांभीर्याने घेत गुरुवारी एका बैठकीत आर्थिक मदतीची घोषणा केली. केंद्र सरकार एकूण 67 पत्रकारांच्या प्रत्येकी कुटुंबास 5 लाख रुपयांची मदत करणार आहे.

संबंधित बातम्या