आईनेच केली 5 मुलांविरोधात FIR दाखल; तीघांना अटक

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 जून 2021

राजगडच्या देवखेडी गावात राहणारी रामकुंवर बाई पती लक्ष्मणसिंग यांच्या निधनानंतर एकटी राहत होती. तीला पाच मुले आहेत पण लग्नानंतर सर्व वेगळे झाले आहेत व वृद्ध आई चा सांभाळ करण्यास कोणीही तयार नाही.

ज्या आईला पाच मुले आहेत, आता तीलाच म्हातारपणात घरोघरी फिरण्याची वेळ आली आहे.  या पाच मुलांपैकी एकही मुलगा म्हातारपणात आईचा आधार होण्यासाठी तयार नाही. शेवटी, त्या आईचे काय झाले असेल? असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. ज्यां मुलांचे लहानपणापासून तरूण्यापर्यंत मोठ्या अभिमानाने पालन पोशन केले गेले त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. लग्न करुन त्यांचे संसार थाटून दिले त्या आई ने आपल्या मुलांसाठी कितीतरी कष्ट सहन केले पण आज तेच मूल आपल्या म्हाताऱ्या आईला दोन वेळचं जेवण देण्यासही तयार नाही. पाच मुलं असल्याचा अभिमान बाळगणारी ही आई आता पोलिस स्टेशनच्या दाराजवळ पोहचली, आणि आपल्या मुलांकडे दोन वेळचं जेवण देण्याची विनवणी करीत आहे.(Mother filed FIR against 5 children)

Covid-19 in Kids: पालकांनी पूर्णपणे जागरूक असणे आवश्यक 

मध्य प्रदेशातील राजगडमधील देवखेडी या गावातील रहिवासी रामकुंवर बाई आपल्या पती लक्ष्मणसिंग यांच्या निधनानंतर एकटीच राहत होती. तीला पाच मुले आहेत पण लग्नानंतर सर्व वेगळे झाले आहेत आणि वृद्ध आईचं संगोपन करण्यास नकार देत आहेत पाच पैकी एकही मुलगा आपल्या आईची म्हातारपणात सेवा करण्यास तयार नाही. असहाय आईने खिलचीपूर पोलिस ठाणे गाठून पोलिसांकडे अपील केली आणि संपूर्ण प्रकरण एसपी प्रदीप शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यानंतर शर्मा त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून त्या बाईच्या पाचही मुलांना समजावून सांगितले पण वृद्ध आईला आधार देण्यास कोणी तयार नव्हते.

Corona Vaccination : विदेशी लसींना भारतात चाचण्यांची गरज नाही 

या प्रकरणी वरीष्ठ पोलिसांनी पाचही मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या आदेशानंतर खिलचीपूर पोलिसांनी वरिष्ठ नागरिक देखभाल अधिनियम कलम 24 अन्वये हिम्मतसिंग, राजेंद्र सिंह आणि धीरज सिंग, सध्या इंदूर येथील तीन रहिवासी, शंकरसिंग हळमुमकम भवानीमंडी आणि रमेशसिंग रा. सोयटाकलांविरूद्ध गुन्हा नोंदविला. गुन्हा नोंदविल्यानंतर खिलचीपूर पोलिसांनी वृद्द आईचे संगोपन न करण्याच्या आरोपाखाली राजेंद्र सिंह, हिम्मतसिंग, रमेश सिंग या तीन मुलांना अटक केली आहे. त्याचवेळी आणखी दोन मुलांना अटक करणे बाकी असून पोलिस ठाण्यात अटक झाल्यानंतर त्यांना त्यांच्या वृद्ध आईची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला.

संबंधित बातम्या