आजारी मुलाच्या इच्छामरणासाठी आईची न्यायालयात याचीका, दोन तासांतच झाला मुलाचा मृत्यू

दैनिक गोमंतक
बुधवार, 2 जून 2021

हर्षवर्धन हा रक्ताशी संबंधीत एका दुर्धर आजाराने  ग्रस्त होता. गरीबी आणिअसहायतेमुळे हर्षवर्धनवर उपचार करणे त्याच्या घरच्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे त्याच्या आईने न्यायालयात त्याच्यासाठी इच्छामरणाचा अर्ज केला.

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका असहाय आईने (Mother) आपल्या 9 वर्षांच्या मुलासाठी इच्छामरणाची मागणी केल्यानंतर दोन तासात त्या मुलाचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील एका आईने आपल्या नऊ वर्ष मुलाची एका दुर्धर आजारातून सुटका करण्यासाठी न्यायालयात त्याच्या इच्छमरणाचा (Euthanasia) अर्ज केल्यानंतर दोन तासातच त्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. 

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका जोडप्याला  हर्षवर्धन नावाचा नऊ वर्षांचा मुलगा होता. त्याला रक्ताशी संबंधित एक दुर्धर आजार झाल्याचे निदान झाले. हे कुटुंब आंध्र प्रदेशातील  चित्तूर जिल्ह्यातील चौडेपल्ली भागातील बिरजेपल्ली गावात राहते.

आईनेच केली 5 मुलांविरोधात FIR दाखल; तीघांना अटक

हर्षवर्धन हा रक्ताशी संबंधीत एका दुर्धर आजाराने  ग्रस्त होता. गरीबी आणिअसहायतेमुळे हर्षवर्धनवर उपचार करणे त्याच्या घरच्यांना शक्य होत नव्हते. त्यामुळे त्याच्या आईने न्यायालयात त्याच्यासाठी इच्छामरणाचा अर्ज केला. जेव्हा हर्षवर्धन चार वर्षांचा होता तेव्हा त्या गरीब जोडप्याला त्यांच्या मुलाला एक दुर्मिळ रक्तचा आजार झाल्याचे समजले. उपचार करूनही त्याची तब्येत सुधारली नाही.  या जोडप्यास त्याच्या उपचारासाठी 4 लाख रुपयांचे कर्जही घ्यावे लागले. त्यामुळे त्यांच्याकडे या व्यतिरीक्त कोणताच पर्याय उरला नव्हता.  हर्षवर्धनची आई अरुणा यांनी मंगळवारी पुणगानूर कोर्टात त्याच्या इच्छामरणाचा अर्ज करत सरकारला  विनंती केली. सरकारने एकतर तिच्या मुलाची काळजी घ्यावी किंवा कोर्टाने त्याला सुखाचे मरण द्यावे. परंतु त्यांची ही आर्त हाक प्रत्यक्ष परमेश्वरानेच ऐकलीतर नाही ना... असे वाटल्यावाचून राहत नाही, कारण याचिका दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात कोर्टातून गावात जाताना हर्षवर्धनने शेवटचा श्वास घेतला.

संबंधित बातम्या