आझाद मैदानावर होणाऱ्या शेतकरी आंदोलनात शरद पवार उपस्थित राहणार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

आझाद मैदानावर होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत.

मुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 23, 24 आणि 25 जानेवारी रोजी आझाद मैदानावर होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत. २५ जानेवारी रोजी ते आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.

संसदेतील खासदारांना जेवणावर आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार

दरम्सयान, सर्वोच्च न्यायालयाने कायद्यांना स्थगिती दिली आहे परंतु केवळ स्थगिती न देता हे कायदे रद्दच करावेत अशी कॉंग्रेसची मागणी आहे. "आम्ही  शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शेतकर्‍यांची मागणी योग्यच आहे. त्यांचे समर्थन करण्यासाठी आम्ही आज कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मोठं आंदोलन करणार आहोत", असं कॉंग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी सांगितलं. 

देवाच्या आशिर्वादामुळेच पाहिला आजचा दिवस - श्रीपाद नाईक 

संबंधित बातम्या